पुणे | राज्य विधीमंडळ अधिवेशनात (Winter Session) पदभरती घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांच्यावरून रंणकंदन पेटलं आहे. तर इकडं सुपे याच्याकडे आणखीन भलीमोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. परिणामी राज्यात खळबळ माजली आहे.
राज्य परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांची सध्या पुणे सायबर पोलीस कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान दररोज नवीन खुलासा होत आहे. आतापर्यंत सुपे यांच्याकडून 3 कोटीहून अधिक संपत्ती जप्त करण्यात आली होती.
आता पोलिसांनी आणखीन 33 लाख रूपये जप्त केले आहेत. परिणामी एकूण आतापर्यंत जप्त केलेली रक्कम ही 3 कोटी 88 लाख रूपये इतकी झाली आहे. सध्या सर्वत्र याच प्रकरणाची चर्चा रंगली आहे.
राज्यात पदभरतीत घोटाळा झाला आहे हे उघड होत असल्याचं पाहून तुकाराम सुपे यांनी आपल्याकडील घबाड आपल्या नातेवाईकांकडं लपवून ठेवलं होतं. आता सुपे याची पोलीस कसून चौकशी करत असल्यानं ही संपत्ती बाहेर येत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असताना सुपेंनी अनेक भ्रष्टाचार केले आहेत. सुपेनं 2018 आणि 2019 च्या टीईटी परिक्षेतील घोटाळ्यातून ही रक्कम उभी केल्याचं आता उघड होत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता लांबपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
22 तारखेला तुकाराम सुपेला 22 लाख रूपये रक्कम मिळाली होती. ही रक्कम सुपेनं आपल्या एका नातेवाईकाकडं ठेवण्यासाठी दिली होती. त्या नातेवाईकानं ती रक्कम आता पोलिसांच्या हवाली केली आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा भरती प्रक्रियेत घोटाळा झाला आहे, असं सांगत पोलीस तपास चालू केला होता. पण या तपासात म्हाडासह टीईटी परीक्षा घोटाळादेखील समोर आला आहे.
राज्यात सध्या आरोग्य भरती, म्हाडा भरती, टीईटी इत्यादी पदभरती प्रक्रिया वादात सापडली आहे. परिणाम विधीमंडळ अधिवेशनात विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. सरकारनं विद्यार्थ्यांचं भविष्य उद्धवस्त केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेनं चालू आहे. परिणामी सीबीआय तपास करण्याची काही गरज नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
दरम्यान, पेपरफुटी प्रकरणानं सरकारला मोठ्या टीेकेचा सामना करावा लागत आहे. परिणामी सरकार या प्रकणाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”
‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल
1 व्यक्ती 4 डोस; Omicronला रोखण्यासाठी देश सज्ज
फक्त बूस्टर डोस घेऊन फायदा नाही, Omicron ला रोखायचं असेल तर…