राष्ट्रवादीच्या आणखी एका युवा तडफदार आमदाराला कोरोनाची लागण

पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. शहरी भागातील असलेला कोरोना लॉकडॉऊन उघडल्यापासून ग्रामीण भागातही पसरला आहे. अशातच लोकप्रतिनिधींना कोरोनो होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादीचे युवा आमदार अतुल वल्लभ बेनके यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात अतुल बेनके यांचे सचिव यांनी माहिती दिली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील एका खाजगी रूग्णलायत दाखल करण्यात आलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही अतुल बेनके यांनी संपर्कात आलेल्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.

अतुल बेनके 13 ऑगस्टला एका विवाहासाठी गेले होते. तेव्हा त्या विवाहातील 22  जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये वर, वधू आणि नवरदेवाचे वडील यांना कोरोनाची लागण झाली होती. या विवाहाला आमदार अतुल बेनके यांच्यासह सुमारे तीनशे नागरिक उपस्थित होते.

आमदार बेनके यांना अंगदुखी, खोकला आदी लक्षणे दिसून आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

27 ऑगस्टला अतुल बेनके यांनी पुण्यात कोरोना चाचणी केली होती आणि याच्या आधल्या दिवशी म्हणजे 26 तारखेला नारायणगाव येथे कोरोनावर उपाय योजना यासंबंधी चर्चा केली होती.

अतुल बेनकेंनी घेतलेल्या कोरोनावर उपाय योजनेच्या बैठकीला राज्याच्या मंत्रिमंडळातील कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी सौरभ कोडोलकर, पोलीस उपअधीक्षक दीपाली खन्ना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार ,तहसीलदार हनुमंत कोळेकर जुन्नरचे मुख्याधिकारी मछिंद्र घोलप उपस्थित होते.

दरम्यान, बैठकीला मोठे-मोठे प्रशासकीय अधिकारी उपस्थित असल्याने त्यांचेही धागे दणाणले आहेत. याआधीही राष्ट्रावादीच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती काहींनी यावर यशस्वीपण मात केली मात्र काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेबरोबर सत्तेत आहे याची खदखद काही कॉंग्रेसजणांच्या मनात आहे”

‘…त्यावेळी महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले’; तुकाराम मुंढेंनी केला खळबळजनक खुलासा

धक्कादायक! “सुशांतचा पाय मोडलेल्या अवस्थेत होता आणि त्याच्या गळ्यासह ‘या’ भागावर सुयांनी टोचलेलं होतं”

‘सत्तेचं दार बंद झाल्यानं भाजपचा घंटानाद…’; रुपाली चाकणकरांचा भाजपला टोला

‘ड्रग्ज विषयीचे ते व्हाट्सअ‌ॅप चॅट्स…’; सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा!