खेळ

‘मिशन वेस्ट इंडिज’! ‘या’ 15 जणांची भारतीय संघासाठी निवड

मुंबई : आयसीसी विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर आता भारतीय संघाची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. 

बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एस.एस. के प्रसाद यांनी भारतीय संघ आणि खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने वेस्ट इंडिज दौऱ्यावरुन माघार घेतली. ही जबाबदारी पेलण्यासाठी रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे. शिखर धवन दुखापतीतून सावरला असून तो या दौऱ्यासाठी सज्ज झालाय. 

भारतीय संघ 3 ऑगस्टपासून जाणार आहे. या दौऱ्यावर कर्णधारपद विराट कोहलीकडेच असणार आहे. तीन टी-20, तीन एकदिवसीय, आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 

एकदिवसीय सामन्यात – कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, कृणाल पंड्या, शिखर धवल, श्रेयश अय्यर, रविंद्र जाडेजा, यष्टीरक्षक रिषभ पंत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहेल, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी, मनिष पांडे, केदार जाधव

T-20 सामन्यासाठी – कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, कृणाल पंड्या, शिखर धवल, श्रेयश अय्यर, रविंद्र जाडेजा, यष्टीरक्षक रिषभ पंत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर.

कसोटी मालिकेसाठी – कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, केएल राहुल, कृणाल पंड्या, शिखर धवल, श्रेयश अय्यर, रविंद्र जाडेजा, यष्टीरक्षक रिषभ पंत, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मनिष पांडे, चेतेश्वर पुजारा, आर. आश्विन, रिद्धिमान साहा, इशांत शर्मा, उमेश यादव, हनुमा विहारी.

महत्वाच्या बातम्या-

-…तर काँग्रेस राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत 10-10 जागा मिळतील- चंद्रकांत पाटील

…अन् जे. पी. नड्डांच्या सुरात चंद्रकांत पाटलांनी सूर मिसळला

-काँग्रेसच्या अवस्थेवर रावसाहेब दानवेंचा विनोदी किस्सा… मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना!

“दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय अन् विधानसभेवर भगवा फडकवायचाय”

-दुष्काळ, नापिकीला कंटाळून गावच काढलं विकायला; मायबाप सरकारनं लक्ष देण्याची गरज

IMPIMP