…अन् ते मला रोज रडवत होते; नीतू कपूर यांनी सांगितल्या पर्सनल आयुष्यातील गोष्टी

मुंबई | बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. यामुळेच तर त्यांच्या निधनाला कित्येक महिने लोटून गेली तरी देखील अद्याप चाहत्यांच्या मनात त्यांच्या आठवणी ताज्या आहेत.

सर्वच चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करत त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नीतू कपूर यांच्याबद्दल देखील नेहमीच चर्चा होत असतात. त्यांच्या प्रेमाबद्दल तर अनेक गोष्टी सांगितल्या जातात.

ऋषि कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रामध्ये नीतू कपूर यांनी त्यांच्या प्रेमाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या आत्मचरित्रामध्ये नीतू कपूर यांनी सांगितलेल्या एका किस्स्याविषयी चर्चा रंगली आहे. ऋषी कपूर मला इतके त्रास द्यायचे की अक्षरशः मी रडायचे, असं नीतू कपूर यांनी म्हटलं आहे.

याविषयी बोलताना नीतू कपूर म्हणतात की, ऋषी कपूर यांना मी त्यावेळी चांगली ओळखत होते. संपूर्ण आयुष्य त्यांच्याबरोबर संसार करण्याची माझी इच्छा होती. परंतु सर्वात जास्त त्रास देणारा बॉयफ्रेंड पण तोच असेल, हे देखील मला माहित होतं.

ऋषी कपूर मला रोज रडवत होते परंतु तरी देखील मला त्यांच्यासोबत राहायचं होतं. त्यांना सहजासहजी ओळखणं कठीण आहे. परंतु त्यांच्यासारखा चांगला माणूस नाही हे देखील मला माहित होतं, असं देखील नीतू कपूर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ऋषि कपूर यांच्या निधनाला बराच काळ लोटला. तरी देखील त्यांच्या चाहत्यांच्या मनात त्यांच्या आठवणी ताज्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सिध्दार्थच्या मृत्यूविषयी सलमानने केलेली भविष्यवाणी ठरली खरी! पाहा व्हिडीओ

सिध्दार्थच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् ती कोमात गेली, वाचा सविस्तर

डॉक्टरांनी सिद्धार्थला ‘या’ गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं परंतु…

शहनाजच्या मांडीवर सिद्धार्थने घेतला अखेरचा श्वास?

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजची अवस्था पाहून तुम्हाला देखील अश्रू अनावर होतील, पाहा फोटो