देश

“नटून थटून टीव्हीवर येण्यापूर्वी मजुरांचे हाल पाहा”

मुंबई |  लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने आणि खाण्याचे हाल होत असल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांनी आता गावाकडची वाट धरली आहे. शेकडो किलोमिटर अंतर चालत असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारला हे हाल दिसत नाहीत का? मोदींनी नटून थटून टीव्हीवर येण्यापूर्वी मजुरांचे हाल पाहावेत, अशी टीका दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केली आहे.

भारत सरकार गेले 45 दिवस टीव्ही पाहात असेल. गरीब गरोदर महिला, लहान मुलं, कामगार अन्न आणि पाण्याशिवाय कित्येक किलोमीटरचा प्रवास पायी करत आहेत. कृपया टीव्हीवर नटून थटून येण्यापूर्वी त्यांचा देखील विचार करावा. या मंडळींची मदत करण्यात सरकारला अपयश आलं आहे, असं टीकास्त्र अनुभव सिन्हा यांनी केंद्रावर सोडलं आहे.

केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांकडे लक्ष द्यायला हवं, अशी अपेक्षा सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. तसंच त्यांच्या वेदना सरकारने जाणून घेऊन त्यांना मदत करा.ला हवी, असं ते म्हणाले.

दरम्यान, अनुभव सिन्हा हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. तसंच विविध मुद्द्यांवर ते आपलं रोखठोक मत मांडत असतात. आज स्थलांतरित मजुरांविषयी त्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच त्यांचा संवेदनात्मक विचार करायला भाग पाडलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-…तर माझा भरोसा धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

-कोरोनानं बदलला वकिलांचा ड्रेस कोड; पाहा आता काय झालाय बदल…

-मॉडेलला प्रवास करायला राज्यपालांनी मदत केल्याचं वृत्त; मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल

-बिनविरोध आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

-देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादेत गुपचूप उरकली बैठक, ‘या’ विषयावर चर्चा झाल्याची शक्यता