नवी दिल्ली | लॉकडाउनमुळे देशवासीयांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दररोज कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे. विरोधकांनी मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या टीकेवर अभिनेता अनुपम खेर संतापले आहेत.
अनुपम खेर यांनी काँग्रेसला खोटं बोलणाऱ्यांचा पक्ष म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाच्या छत्तीसगड येथील समितीने नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आजवरचे सर्वात कमकूवत पंतप्रधान” असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेवर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खोटं बोलू नका, हा विनोद तर एक एप्रिलला देखील चालणार नाही, असं ट्विट करत अनुपम खेर यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, अनुपम खेर सोशल मीडियावर सक्रिय असतात. मोदी सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला ते पाठिंबा देत असतात. तसेच कोणीही सरकारविरोधात टीका केली तर त्यांना खडेबोल सुनावतात. या पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांनी केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
चल….. झूठे कहीं के!! ये जोक तो 1st April वाले दिन भी फ़िट नहीं बैठता।🤣🤣😂🤓 https://t.co/mD5GE9EnCH
— Anupam Kher (@AnupamPKher) May 19, 2020
महत्वाच्या बातम्या-
-लॉकडाउनचा नियम मोडला; ‘या’ भाजप आमदारावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल
-“बिरोबाच्या शपथेचं मी अन् बिरोबा बघून घेऊ; पवारांच्या बगलबच्च्यांनी मला सांगू नये”
-…पण तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात- बाळासाहेब थोरात