अजान, हनुमान चालीसा वादावर अनुराधा पौडवाल यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

मुंबई | प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील लागलेले भोंगे खाली उतरावावे लागतील, हा निर्णय सरकारने घ्यावा लागले. निर्णय नाही घेतला तर मशिदींसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला.

राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आता यावादावर गायिका अनुराधा पौडवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी जगातील अनेक ठिकाणी फिरले. पण आपल्या भारतात जसं होतं तसं मी कुठेही घडताना पाहिलं नाही. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र आपल्या इथे जबरदस्तीने प्रोत्साहन दिलं जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

मशिदीवर लाउडस्पीकर लावून अजान वाजवली जाते. त्यामुळे इतर धर्मियांना वाटतं की आम्ही असं का करू नये, असंही त्या म्हणाल्यात. त्या एका मुलाखतीत बोलत होते.

मी अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे. पण तिथे लाउडस्पीकरवर बंदी आहे. मुस्लीम देशात लाउडस्पीकरवर अजान ऐकायला मिळत नाही, मग हे फक्त भारतातच का होतं?, असंही त्यांनी म्हटलं आहे.

जर देशात अजान अशीच असेल तर देशातील इतर लोकही अशा प्रकारे हनुमान चालीसा वाजवतील. यामुळे पुढे वाद निर्माण होतात, जे खूप वाईट आहे, असं त्या म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 

“…म्हणून मी माझ्या प्रभागात हनुमान चालीसाचे भोंगे लावणार नाही” 

“…यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही” 

मोठी बातमी! कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय 

‘या’ 6 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज