‘दोन बायका अन् अनुराग कश्यपचे ऐका’

मुंबई | बॉलिवूडमधील मोठे आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) सतत आपल्या वक्तव्ये आणि चित्रपटांना घेऊन चर्चेत असतात. त्यांनी आता आपल्या खासगी आयुष्याविषयी एक फोटो शेअर केला आहे.

अनुराग कश्यप हे कोणत्याही विषयावर आपले परखड मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे चित्रपट देखील वास्तववादी असतात. त्यांच्या चित्रपटांची गणणा कला चित्रपटात (Art Films) केली जाऊ शकते.

ब्लॅक फ्रायडे (Black Friday) आणि पांच (Paanch) हे त्यांचे वादग्रस्त चित्रपट आहेत. त्यावर सेंसर बोर्डाने (Censor Board of India) बंदी घातली होती. त्यांचे दोन वेळा विवाह झाले आहेत. दोनही पत्नीपासून त्यांचा काडीमोड देखील झाला आहे.

अनुराग कश्यप हे सध्या आपला आगामी चित्रपट ‘दोबारा’ चे प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. त्याच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasi Pannu) मुख्य भूमिकेत आहेत.

अनुराग कश्यप यांनी आपल्या अधिकृत इंन्साटाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी आपल्या दोनही पत्नींसोबत फोटो टाकला आहे. आणि त्याला त्यांनी ‘माय टू पिल्लारस्’ (My Two Pillars) असे कॅपशन दिले आहे.

अनुराग आपल्या पूर्व पत्नी आरती बजाज (Aarati Bajaj) आणि कलकी कोचलीनसोबत (Kalki Kochlin) या फोटोत दिसत आहेत. त्यांनी या फोटोला माझे दोन आधारस्तंभ असे शीर्षक दिले आहे.

अनुराग कश्यप यांनी 1997 साली आरती बजाज यांच्यासोबत विवाह केला होता. त्यांना एक कन्या आलिया कश्यप देखील आहे. 12 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी एकमेकापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर कश्यप यांनी 2011 साली कल्कीसोबत विवाह केला. त्यांनी देखील त्यानंतर काही कारणामुळे 2015 साली काडीमोड घेतला.

महत्वाच्या बातम्या – 

उद्यनराजेंनी तोंडाने भरवला पेढा…

‘आले रे आले, गद्दार आले’, ‘पन्नास खोके, एकदम ओके’

“शरद पोंक्षे आतंकवादी, नथुरामाची औलाद आहे”

‘जेलवारीसाठी तयार राहा’, भाजप नेत्याच्या इशाऱ्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

हाच तुमचा अमृतमहोत्सव आहे का? असादुद्दीन ओवेसींचे केंद्र सरकारवर आरोप