लग्नापूर्वी केलेल्या ‘त्या’ मोठ्या विधानावरून अनुष्काचा ‘यु टर्न’; व्हिडीओ व्हायरल

मुंबई | अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हे दोघे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी या दोघांनी एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. यामुळे सध्या या दोघांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

मुलीच्या जन्मामुळे हे दोघे खूप जास्त खुश आहेत. विराट आणि अनुष्का सोशल मीडियावरून आपल्या आयुष्यातील हे आनंदाचे क्षण सतत चाहत्यांबर शेअर करताना दिसत असतात. चाहते देखील विरुष्काच्या फोटोला भरभरून प्रेम देत असतात.

तसेच आता मुलगी थोडी मोठी झाल्यानंतर विराट क्रिकेट खेळण्यात व्यस्त झाला आहे. तर अनुष्का देखील खूप दिवसांच्या ब्रेकनंतर शुटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. नुकतंच अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.

हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती मेक अपच्या खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तसेच तिच्या अवतीभोवती तिची टीम देखील दिसत आहे. या फोटोमध्ये अनुष्का स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे. तर तिचा मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट तिचा मेकअप करताना दिसत आहेत.

परंतु अनुष्काचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकाऱ्यांनी अनुष्काला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही नेटिझन्सने अनुष्काचा एक जुना व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का तिच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे.

सिमी ग्रेवाल यांनी अनुष्काची ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये सिमी यांनी अनुष्काला तिच्या लग्नाबद्दल सवाल केला होता. अनुष्काने देखील दिलखुलासपणे या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं.

सिमी ग्रेवाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अनुष्का म्हणाली होती की, लग्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच मला मुले पण हवी आहेत. लग्न झाल्यावर मी कदाचीत काम करणार नाही.

मात्र, आता मुलगी झाल्यानंतर देखील अनुष्का पुन्हा एकदा कामावर लोटल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनुष्का तिच्या बोलण्यावर ठाम राहिली नसल्याचं नेटकारी बोलत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बॉलिवूडचं हे सुपर हॉट कपल लवकरंच विवाह बंधनात अडकणार?

सलाम! हॉस्पिटलला आग लागली तरी देखील डॉक्टर रुग्णाची सर्जरी करतच राहिले; पाहा व्हिडीओ

सोने पे सुहागा! ऐन लग्नाच्या सिझनमध्ये सोनं आणखी उतरलं; वाचा आजचा दर

535 भागांचा टप्पा पूर्ण करून ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

लाईव्ह कार्यक्रमातच गेस्टवर पडला टीव्ही स्टुडिओचा सेट, पुढे…