“किरीट सोमय्यांना वाॅचमनची नोकरी द्या, नाहीतर माळ्याची नोकरी द्या…”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वादळी पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकारणात गोंधळाची स्थिती निर्माण झालीये. भाजप आणि आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

संजय राऊत यांनी सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे तसेच इतर गंभीर आरोप लगावले आहेत. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला किरीट सोमय्या जबाबदार असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.

त्यावरून आता राजकारणात कलगीतुरा रंगल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर हाच माणूस सर्वात पुढं होता. त्यावेळी हाच माणूस सर्वत्र धावत होता, असं अक्षता नाईक यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांना एक विनंती केली.

रश्मीताईंना माझी विनंती आहे की, सोमय्यांना आताही जमिनीच्या प्रकरणात एवढा इंटरेस्ट आहे, त्याला एखाद्या माळ्याचं काम तरी मिळून द्या, असं अक्षता नाईक म्हणाल्या.

किरीट सोमय्या यांना माळ्याचे काम दिले तर ते त्या झाडांची तरी देखरेख करतील. माळ्याची नाही जमली तर कमीत कमी त्यांना वॉचमनची तरी नोकरी द्यावी, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

सोमय्यांना जर एखादी माहिती हवी असेल तर माहितीच्या अधिकाराचा उपयोग करू शकतात. त्यासाठी तुम्हाला शक्तीप्रदर्शन करण्याची काहीच गरज नाही, असंही त्यावेळी म्हणाल्या आहेत.

किरीट सोमय्या ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते त्यांनी तातडीनं थांबावं अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटच्या RCBला मिळणार नवा कर्णधार; आता धोनीचा ‘हा’ भिडू सांभाळणार जबाबदारी

मुंबईच्या बोरिवली परिसरातील 24 मजली इमारतीला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती

Video: ‘ऊ अंटावा’नंतर समांथाचा आणखी एक डान्स व्हायरल; विमानतळावर नक्की काय झालं?

“बाबा परत असं घोड्यावर बसायचं नाही”; अमोल कोल्हेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

  “…हिशोब इथेच चुकते करणार”; निलेश राणे आक्रमक