सचिन वाझे प्रकरणावरुन महाविकास आघाडीत मतभेद आहेत का?, अजित पवारांनी केला खुलासा म्हणाले…

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौ.कशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक करण्यात आली. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.

सचिन वाझे यांच्या अ.टकेनंतर राज्यातील ठाकरे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला असल्याचंही बोललं जात आहे. तसेच भाजप नेते जास्तच आक्रमक झाले असल्याचं दिसतं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीत सचिन वाझे प्रकरणावरुन मतभेद सुरु झाले असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीत सचिन वाझे यांच्या प्रकरणावरुन कोणत्याच प्रकराचे मतभेद नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाही. आज सकाळीच एक बैठक पार पडली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मी, नाना पटोले, एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख हे सगळेच होते, असं अजित पवार यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून हे सरकार केलं आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चांगली चालली पाहिजे. कोण कोणत्या पक्षाचा आहे हा त्याच प्रश्न आहे. तपासात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप असणार नाही.

सचिन वाझे या प्रकरणाची चौकशी ATS आणि NIA अशा दोन तपास संस्थांकडून सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात जो कोणी दो.षी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं अजित पवार म्हणाले आहेत.

तसेच या प्रकरणाचे ज्यांच्यापर्यंत धागेदोरे पोहचतील त्यांना सोडणार नाही. दो.षींना संरक्षण देणार नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, जी काही चौकशी सुरु आहे. तपासात जे कोणी दो.षी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतू चौकशीआधी कोणाला शिक्षा करावी, हेदेखील अयोग्य असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! आता पेट्रोल-डिझेलचे दर खाली येणार? निर्मला सीतारमण म्हणाल्या…

नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहून सं.तापली बायको, मग भररस्त्यात घडला ‘हा’ प्रकार

आनंद महिंद्रा यांनी लसीकरणासंदर्भात नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ मागणी

‘पुढील पाच वर्षात देणार एक लाख लोकांना नोकऱ्या,’ ‘या’ अभिनेत्यानं केली मोठी घोषणा

राज्यात पुढील काही दिवस हवामान खात्याकडून ‘या’ भागात पावसाचा इशारा