तुम्हीही सोनं खरेदी करायचा विचार करताय का? वाचा आजचा दर

जळगाव | स्त्रियांना सोन्याचे दागिने घालण्याची एक वेगळीच हौस असते. कोणताही सन म्हटलं की सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पहायला मिळते. सोन्याची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार पहायला मिळाली होती. मात्र, आज सोन्याच्या दरात कोणतीही चढउतार दिसून आली नाही. आज सोन्याचे दर स्थिरावले आहेत. सोन्याचा आजचा दर तोळ्यामागे 51,410 रुपये इतका झाला आहे. सराफा बाजार थोडा स्थिरावल्याने काल हा भाव 200 रुपयांनी वाढून 51,410 रुपयांवर स्थिरावला आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा दर प्रती किलोमागे 69,208 रुपये इतका झाला आहे. यावर्षी सोन्याच्या किंमतीमध्ये तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर येत्या काळात सोन्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन वसूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच राजकारण तापलं! ‘या’ बड्या नेत्याने दिला सावधानतेचा ईशारा

भाजपला मोठं खिंडार! आणखी एका बड्या महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

“मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच त्याबरोबर पैसा, उत्पादनाला हमीभाव आणि…”

मोठी बातमी! अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल, जडला ‘हा’ गंभीर आजार

“शरद पवार तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे”