सोलापूर | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अनेक नेते आता जाहिर नाराजी व्यक्त करत आहेत. शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्षात लाभ घेत पवार सरकार, असं म्हटलं होतं. त्यातच आता शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे.
आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. शिवसेना विस्थापितांचा गट आहे. आम्हाला कोणीही आजमावून बघू नये. अर्थसंकल्पामध्ये देखील हेच दिसून आलं आहे, असा घणाघात तानाजी सावंत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केला आहे.
सत्ता तुम्ही स्वप्नात देखील पाहिली होती का?, ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली त्यांच्यावरच तुम्ही अन्याय करत आहात?, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील कोटी रूपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जात आहे. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहत आहोत, असं तानाजी सावंत म्हणाले आहेत.
मागील अडीच वर्षांत केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा. शिवसेनेला महाविकास आघाडीत कायमचं दुय्यम वागणूक मिळाली आहे. भाजपसोबत सत्तेत असतानाही आमच्यासोबत हेच घडलं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात अचानक सत्तांतर झाले. आपण ज्यांना पारंपारिक शत्रू मानतो. आज पत्रकारांना ऐकायचं असेल ,युवासेनेला ऐकायचं असेल विविध पक्षाच्या लोकांना ऐकायचं असेल की, तानाजी सावंत आज नेमकं काय बोलतो. 2019 पासून तानाजी सावंतने जर पक्षाची विरूद्ध भूमिका घेतल्याचं दाखवलं तर मी आमदारकीचा राजीनामा देतो, असं तानाजी सावंत म्हणाले.
दरम्यान, एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नयेत असं ठरलेलं असताना देखील असं का होत आहे?, आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर प्रचंड नाराजी आहे, असं तानाजी सावंतांना बोलून दाखवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार”
डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव
घर खरेदी करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुद्रांक शुल्क विभागाने घेतला मोठा निर्णय