नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाच्या अनेक याचिकांवर सुनावणी सुरु आहे. यावेळी शिवसेना कोणाची, निवडणूक चिन्हाचे काय आणि 16 अपात्र आमदारांच्या कारवाईवर युक्तीवाद सुरु आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षाची यावेळी सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीत दोनही पक्षांना विविध मुद्यांवर आपली बाजू मांडण्याचे आदेश पाच सदस्यीय घटनापिठाने दिले आहेत.
यावेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी शिवसेनेच्या वतीने न्यायालयात युक्तीवाद केला. कपिल सिब्बल यांनी हा संपूर्ण वाद केव्हा सुरु झाला आणि त्यात ते तीन दिवस का महत्वाचे आहेत, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
20 जून रोजी या सर्व गोष्टी सुरु झाल्या. 21 जून रोजी सर्व आमदारांची एक बैठक बोलावण्यात आली, पण त्यातील अनेक गैरहजर राहिले आणि गुवाहाटीला गेले, असे सिब्बल म्हणाले.
त्यामुळे जे बैठकीला आले नाहीत त्यांच्यावर पक्षाची शिस्त मोडल्याची कारवाई केली गेली आहे. आणि त्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागेल. तिसरा दिवस म्हणजे शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली, असे सिब्बल न्यायालयात म्हणाले.
विधीमंडळातील बैठकीला आमदार आले नाहीत. पण सरकार स्थापनेच्यावेळी आले. आणि हीच पक्षविरोधी कारवाई असल्याचा युक्तीवाद सिब्बल यांनी न्यायालयात केला.
निवडणूक आयोगाला (Election Commission) शिंदे हे आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. तो साफ चुकीचा असल्याचा युक्तीवाद देखील सिब्बल यांनी केला. शिवसेनेतून वेगळे झाल्यावर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन सरकार बनवायला पाहिजे होते, असे देखील सिब्बल म्हणाले.
ते आमदार इतर पक्षात गेल्यावर त्यांचे सदस्यत्व गेले असते. ते पक्षावर कब्जा करु शकत नाहीत, असा युक्तीवाद शिवसेनेच्यावतीने कपिल सिब्बल यांनी केला.
महत्वाच्या बातम्या –
“गुजरातचा सिंह महाराष्ट्रात येणार आणि महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार” – सुंधीर मुनगंटीवार
“उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे”; भाजप नेत्याची मोठी टीका
रायगडावरील पिंडदानाचे हिंदुत्वादी संघटनाकडून समर्थन; म्हणाले, “संभाजी ब्रिग्रेडचा आरोप…”