…अन् रस्त्यावर पडला पैशांचा पाऊस; नोटा गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

अटलांटा : अमेरिकेतील जर्जियाजवळतच्या अटलांटामध्ये रस्त्यावर मंगळवारी पैशांचा पाऊस पाहायला मिळाला आहे.

पैसे घेऊन निघालेल्या ट्रकचा दरवाजा मधेच उघडला. ट्रकमधील नोटा रस्त्यावर नोटाच नोटा पसरल्या. इतर प्रवाशांनी रस्त्यावर नोटा पाहून गाड्या थांबवून त्यांनी नोटा गोळा करत होते.

एखाद्या सिनेमाला शोभावं असं ते दृश्य दिसत होतं. लोकं गाड्या थांबवून पैसे गोळा करत होते, असं तिथल्या स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे.

जवळपास 1 लाख 75 हजार डॉलर म्हणजेच सव्वा कोटींच्या नोटा ट्रकमधून हवेत उडाल्या. त्या नोटा सापडल्याच नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस आणि ट्रकमधील कर्मचाऱ्यांनी अनेक नोटा गोळा केल्या पण खूप नोटा गायब आहेत. त्याची माहिती अद्याप मिळाली नाही, असंही पोलिसांनी सांगितलं.

जे लोक नोटा घेईन घरी परतले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ज्यांच्याकडे नोटा सापडतील त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.