विंग कमांडर अभिनंदन यांना दिलेल्या त्रासाचा भारतीय लष्कराने ‘असा’ घेतला बदला

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान काश्मीर खोऱ्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात घुसखोरी करणाराऱ्या 2 दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने 21 ऑगस्टला जिवंत पकडलं होतं. या दहशतवाद्यांकडून कबुलीजबाब नोंदवून त्याचा व्हीडिओ बुधवारी भारतीय लष्कराने शेअर केला आहे.

भारतीय लष्कराने या दहशतवाद्यांचा व्हीडिओ बनवला आहे. त्यामध्ये लष्कर ए तोयबाचे दहशतवादी असल्याचं त्या दहशतवाद्यांनी कबूल केलं आहे. एका दहशतवाद्याचे नाव मोहम्मद अजीम आहे. तो पाकिस्तानच्या रावलपिंडीमधून आला अहे. तर दुसरा दहशतवादी हा पाकिस्तानाच्या गाजी आबाद शहरातला आहे.

काश्मीर खोऱ्यात शांतता भंग करण्यासाठी दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा  प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. 21 ऑगस्टला लष्कराने  या दोन दहशतवाद्यांना पकडले होते. हे पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचे दहशतवादी असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं भारतीय लष्कराचे चिनार कॉर्प्सचे कमांडर जनरल के.जे.एस. ढिल्लो यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे.

कबुलीजबाब नोंदवल्यानंतर भारतीय लष्करांनी त्या दहशतवाद्यांना चहा दिला. त्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की चहा कसा आहे?. त्यावर चहा चांगला अहे, असं दहशदवाद्यांनी म्हटलं.

दरम्यान, विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानी लष्कर आधिकाऱ्याने हाच प्रश्न केला होता. भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या स्टाईलमध्ये या दहशतवाद्यांना प्रश्न विचारल्याचं बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या-