मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयनं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
परमबीर सिंह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर ‘सामना’तून प्रतिक्रिया दिली होती. लोकशाहीला वाचवण्यासाठी न्यायालयांनंच पुढे यावं लागेल, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटंल आहे.
पुन्हा राज्य सरकारांच्या अधिकारांवर आक्रमण समोर आलं आहे असंही मत सामनातून मांडण्यात आलं आहे. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सेनेचे मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण आहे. त्यामुळेच त्यांनी न्याय व्यवस्थेवर टिप्पणी केली आहे. या गंभीर वक्तव्यावर न्यायालयाने कारवाई करावी, असा आक्रमक पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र सरकारकडून सिंह यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडीकडून सुरु होता. मात्र, आता महाराष्ट्र सरकारला हा मोठा झटका मिळाला आहे.
महाराष्ट्र सरकारचा सीबीआय चौकशीला विरोध असल्याचंही सरकारी वकिलांनी सांगितलं. त्यामुळे आता सीबीआयकडून या सर्व प्रकरणांचा तपास कसा केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आमदारांना मोफत घर मिळणार नाही’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
“…तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार चालणार”
‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन Omicron BA.2, वेळीच व्हा सावध!
‘एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत ऐकलं नाही तर…’; अजित पवारांचा इशारा
‘RRR’ चिटपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मोडले मागचे सगळे Records