Top news देश विदेश

‘या’ व्यक्तीने सातासमुद्रापार आपल्या मातृभाषेची किर्ती उंचावली; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | आपल्या सर्वांना प्रत्येक वेळी इंग्रजी समजलेच असं नाही. काही वेळा आपल्याला एखादा शब्द समजत नाही, त्यामुळे अडचण येते. मग आपण ते वाचण्यास टाळतो. पण एका युवकाने चक्क सातासमुद्रापार स्वतःची मातृभाषा उंचावली आहे.

अर्णब घोष राय यांनी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातील आरोग्य विभागाचे अधिकृत संकेतस्थळ हे बंगाली भाषेत सुरू केले आहे. ही खरंतर बंगालबरोबरच देशासाठीही एक अभिमानाची गोष्ट आहे. याचबरोबर तिथे राहणाऱ्या बंगाली लोकांसाठी ही सुविधा खूपच फायदेशीर ठरत आहे. व्हिक्टोरिया राज्यात गेल्या सात दशकांपासून बंगाली लोक राहत आहेत.

ही संख्या काही हजारात नसून काही लाखांमध्ये आहे. विशेष म्हणजे ही संख्या वाढतच आहे. तिथे कोणत्याही ठिकाणी बंगाली भाषा वापरली जात नव्हती. अशा परिस्थितीत वयस्कर बंगाली भाषिकांना याचा त्रास व्हायचा. जेव्हा काही खरेदी करायचे असेल तेव्हा अडचण व्हायची. ही गोष्ट मेलबर्नमध्ये राहणाऱ्या 38 वर्षीय अर्णब घोष राय यांना सतावत होती.

मग यावर त्यांनी विचार केला की, आपण जर विविध संकेतस्थळ बंगाली भाषेत सुरू केले तर वयस्कर व्यक्तींना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यास सोयीस्कर होईल. यातच आता व्हिक्टोरिया राज्यात कोरोनाचे संक्रमण गतीने वाढत होते. ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर अर्णब यांनी जास्तीत जास्त संकेतस्थळ बंगाली भाषेत सुरू करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी अर्णब यांनी स्थानिक खासदारांशी या विषयावर चर्चा केली. यानंतर त्यांनी मेलबर्न विद्यापीठ आणि व्हिक्टोरिया विद्यापीठात हा प्रश्न चर्चेसाठी उपस्थित केला. मग तेथून हा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात आला. ऑस्ट्रेलिया सरकारमध्ये सरकारी धोरण ठरवण्यात या विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका आहे.

यानंतर व्हिक्टोरिया राज्यातील प्रशासनाने विविध संकेतस्थळ बंगाली भाषेत करण्यास मान्यता दिली. इथे आरोग्याच्या संदर्भातील सर्व गोष्टी बंगाली भाषेत लिहिल्या गेल्या. अर्णब यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातील सर्व उपचारांचा खर्च सरकार उचलते. इथे सर्वांना मेडिकेअर कार्ड दिले होते. सर्व लोक ते कार्ड दाखवून उपचार घेऊ शकतात. आता संकेतस्थळ बंगाली भाषेत सुरू झाल्यामुळे याचा फायदा तिथे राहणाऱ्या सर्व बंगाली नागरिकांना होणार आहे.

विशेषतः वयस्कर नागरिकांना याचा जास्त फायदा होईल. अर्णब हे मूळचे कोलकाताजवळील बरसटमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील सरकारी नोकरी करत होते. त्यांचे कुटुंब आर्थिक परिस्थितीशी झुंजत असतानाही शिक्षण घेण्यासाठी 2003 मध्ये अर्णब ऑस्ट्रेलियाला निघून गेले. दोन वर्षानंतर त्यांनी फेडरल विद्यापीठातुन वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. यानंतर 2007 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अकाउंटसचे सदस्य झाले.

दोन वर्षांनी 2009 मध्ये त्यांना तेथील नागरिकत्वाचा हक्क मिळाला. त्यानंतर 2017 मध्ये व्हिक्टोरिया विद्यापीठातुन एमबीएचे शिक्षण घेतले. अर्णब यांचे म्हणणे आहे की, व्हिक्टोरियामध्ये बंगाली भाषिकांची संख्या वाढत आहे. यामुळे आता त्यांचा पुढील संघर्ष हा असेल की, तेथील दुसरी भाषा म्हणून बंगालचा समावेश व्हावा. तेथील शाळांमध्ये बंगाली शिकवल्याने मुलांना त्याचा खूपच फायदा होईल. यासाठी त्यांनी व्हिक्टोरियातील राज्य प्रशासनाकडे अर्जही केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

स्वतःचाच ‘तो’ विक्रम मोडत शिखर धवन ठरला ‘चौकार किंग’!

काय सांगता! काहीच डाऊन पेमेंट न करता ‘ही’ गाडी खरेदी करता येणार

सचिन तेंडूलकर नंतर आता केएल राहुलनंही केला ‘तो’ विक्रम!

परिस्थितीवर मात करत हिमाचलचा ‘हा’ व्यक्ती न्यूझीलंड सरकारमध्ये बनला मंत्री!; वाचा सविस्तर

आयपीलमध्ये ‘या’ युवा खेळाडूनं अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकत रचला नवा विक्रम!