Top news देश मनोरंजन

अर्णब गोस्वामीला मोठा धक्का! आता ‘या’ प्रकरणी पाय आणखी खोलात

मुंबई | काही महिन्यांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूप्रकरणी अनेक नवे पैलू समोर येत होते. त्यातच बॉलिवूडमधील ड्र.ग्ज कनेक्शनचा एक मुद्दा समोर आला होता. तेव्हापासून अनेक वृत्त वाहिन्या बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल उलटसुलट बोलत होते आणि तशाच प्रकारच्या बातम्याही दाखवत होते.

आता ज्या वृत्तवाहिन्यांनी अशा बातम्या दाखवल्या होत्या, त्यांच्या ही गोष्ट अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण आता मोठ-मोठ्या कलाकारांनी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि अमीर खान यांचे प्रॉडक्शन हाऊस तसेच अन्य छोटे-मोठे प्रॉडक्शन हाऊस यांच्याबरोबर 38 जणांनी मिळून आता न्यायालयात धाव घेतली आहे.

यामुळे आता अर्णब गोस्वामी आणि बॉलिवूड असा नवा वाद पेटण्याची शक्यता दिसत आहे. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी, रिपोर्टर प्रदीप भंडारी, टाईम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिवशंकर आणि समूहाचे संपादक नविका कुमार यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात सर्व खान मंडळी आणि प्रॉडक्शन हाऊस यांनी याचिका दाखल केली आहे.

अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, अमीर खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्याबरोबर बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकारांचा यात समावेश आहे. काही वृत्तवाहिन्यांनी बॉलिवूड कलाकारांविरोधात ड.र्ट, फिल्थ, स्कम, ड्र.गीज अशा काही अपमानास्पद आणि बेजबाबदार शब्दांचा वापर केला आहे.

यामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीची बदनामी झाली आहे. या सर्व वृत्तवाहिन्यांनी वापरलेले शब्द अपमानजनक आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. त्याचबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीविरुद्ध बदनामी करणारा, बेजबाबदार आणि अपमानास्पद कोणतीही टीका प्रसिद्ध करू नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

अमीर खान प्रॉडक्शन्स, स्क्रीनरायटर्स असोसिएशन, अ‌ॅड-लॅब फिल्म्स, द सिने ऍन्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन, द प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया, अजय देवगण फिल्म्स, आंदोलन फिल्म्स, अनिल कपूर फिल्म ऍन्ड कम्युनिकेशन नेटवर्क यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर अरबाज खान प्रॉडक्शन्स, आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शन्स, बीएसके नेटवर्क ऍन्ड एंटरटेनमेंट, केप ऑफ गुड फिल्म्स, धर्मा प्रॉडक्शन्स, एक्सेल एंटरटेनमेंट, फिल्मक्राफ्ट प्रॉडक्शन्स, कबीर खान फिल्म्स, नाडियावाला ग्रँडसन एंटरटेनमेंट यांचा समावेश आहे.

तसेच रिलायन्स बिग एंटरटेनमेंट, रेड चिलीज एंटरटेनमेंट, रिअल लाईफ प्रॉडक्शन्स, रोहित शेट्टी पिचर्स, रॉय कपूर प्रॉडक्शन्स, सलमान खान व्हेंचर्स, सोहेल खान प्रॉडक्शन्स, सिख्या एंटरटेनमेंट, विनोद चोपडा फिल्म्स, यशराज फिल्म्स आणि विशाल भारद्वाज या दिग्गज प्रॉडक्शन हाऊसचाही यात समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…म्हणून वडिलांचा जीव वाचवता आला नाही’; रितेश देशमुखनं सांगितलं विलासरावांच्या मृ.त्यूचं खरं कारण

भडकावू बातम्या पसरवणाऱ्या वाहिन्यांविरोधात पार्लेजी कंपनीनं घेतला मोठा निर्णय

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी! रियाला पाठींबा देत म्हणाला…

मित्रांच्या मदतीने त्याला मिळाले नवीन आयुष्याचे गिफ्ट; सोनू सूदही मदतीसाठी धावला

सुशांत प्रकरणी आता अमित शहांनी देखील सोडलं मौन; महाराष्ट्र सरकारवर आरोप करत म्हणाले..