नवी दिल्ली | आगामी उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीवरून (Uttar Pradesh Assembly election) राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कानपूर येथील सभेत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यातच काँग्रेस(Congress) नेत्या तथा उत्तर प्रदेश काँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी लडकी हुं लड सकती हुं ही घोषणा दिली आहे. प्रियंका गांधी महिलांचे प्रश्न प्रखरतेने मांडत आहे.
यावेळी प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अमेठीमध्ये एका दलित मुलीला बेदम मारहाणीची घटना अत्यंत निंदनीय आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना टॅग करत प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथजी तुमच्या राज्यात दररोज दलितांविरूद्ध सरासरी 35 तर महिलांच्या विरोधात 135 गुन्ह्यांची नोंद होते. तरीही तुमची कायदा आणि सुव्यवस्था निद्रीत अवस्थेत असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
हे अमानवीय कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना जर 24 तासांच्या आत पकडले नाही तर काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असं प्रियंका गांधी यांनी सांगितलं आहे.
प्रियंका गांधी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अत्यंत निर्दयपणे मुलीला मारहाण केली जात आहे. विशेष म्हणजे त्याठिकाणी घरातील महिलाही दिसत आहेत. त्या कुठेही या कृत्याचा विरोध करताना दिसत नाहीत.
या प्रियंका गांधी यांनी आरोपींना 24 तासांच्या आत अटक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
सदर घटना अमेठी कोतवाली भागातील रायपुर फुलवारी गावातील असल्याची माहिती आहे. या घटनेबाबत पोलिस अधिकारी विनोद सिंह (Vinod Singh) यांनी ही घटना 8 ते 10 दिवसांपुर्वी घडल्याचं सांगितलं आहे.
तसेच त्यांनी सांगितलं आहे की, आरोपी तरूणाला अटक करण्यात आली आहे. पुन्हा कारवाई करण्यासाठी जलद गतीने तपास सुरू आहे. पीडित तरूणी आणि तिच्या कुटूंबियांकडून तक्रार दाखल करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तक्रार प्राप्त होताच गुन्हा नोंदवून कारवाई केली जाईल, असं विनोद सिंह यांनी सांगितलं आहे.
पाहा ट्विट-
अमेठी में दलित बच्ची को निर्ममता से पीटने वाली ये घटना निंदनीय है। @myogiadityanath जी आपके राज में हर रोज दलितों के खिलाफ औसतन 34 अपराध की घटनाएं होती हैं, और 135 महिलाओं के ख़िलाफ़, फिर भी आपकी कानून व्यवस्था सो रही है।…1/2 pic.twitter.com/mv1muAMxkr
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 29, 2021
महत्त्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेल 25 रूपयांनी स्वस्त; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ख्रिसमस पार्टी भोवणार! अर्जुन कपूरसह ‘या’ 3 जणांना कोरोनाची लागण
नितेश राणेंना अटक होणार?; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका
‘…हा धोक्याचा अलार्म आहे’; लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा