आदर्श तहसीलदार पुरस्कार मिळालेल्या ‘या’ तहसीलदाराला अटक

पैठण : महसूलसारख्या विभागात चांगले काम केल्याबद्दल आदर्श तहसीलदार पुरस्कार मिळालेल्या अधिकाऱ्याने या आदर्शालाच कलंक फासल्याचा प्रकार समोर आला आहे. कुळाची जमीन परत मिळाण्याच्या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी 30 लाख रूपयांची लाच मागितली. 

महसूल प्रशासनातील आदर्श व्यक्तिमत्व अशी महेश सावंत यांची ओळख आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा आदर्श तहसीलदार म्हणून नुकताच गौरव करण्यात आला होता. आदर्श तहसीलदारालाच लाच घेताना पकडण्यात आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने पैठण तालुक्यातील पांगरा येथील १२ एकर 14 आर कुळाची जमीन खरेदी केली आहे. ही जमीन परत मिळावी, म्हणून मूळ मालकाच्या नातेवाईकांनी पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे दावा दाखल केला होता.

रविवारी (29 सप्टेंबर) पैठण तहसील कार्यालयात एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. यावेळी तहसीलदार सावंत यांनी त्यांच्या कार्यालयातच अ‍ॅड. कैलास लिपने पाटील आणि बद्रीनाथ यांच्या उपस्थितीत लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून एक लाख रुपये घेतले. 

दरम्यान, वकिल आणि मदतनिसाच्या हाताने 1 लाख रूपयांची लाच घेताना पैठणचे तहसीलदार महेश नारायण सावंत यांनालाचेची रक्कम घेताच पोलिसांनी आरोपींना रकमेसह रंगेहात पकडले.

महत्वाच्या बातम्या-