“सचिन वाझे यांना अटक करुन महाराष्ट्र पोलिस दलाचा अपमान केला”

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौ.कशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक केली आहे. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.

मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अ.टकेनंतर भाजप नेते जास्तच आक्रमक झाले असल्याचं दिसतं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आणि सरकारविरोधात अनेक टीका केल्या जाता आहेत. मात्र या टीकेला शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.

सुशांतसिंह राजपूत आ.त्मह.त्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी उत्तम तपास केला. तरी केंद्राने तपास करण्यासाठी सीबीईआयला घुसवले. त्य सीबीआयने तरी कुठे दिवे लावलेत? हात चोळत बसलेत, असं म्हणत शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

सचिन वाझे यांना अ.टक करुन महाराष्ट्र पोलिस दलाचा अपमान केला असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे. तसेच हे सर्व ठरवून केलं जात आहे. सचिन वाझे यांना अ.टक करुन दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत, ते राज्याच्या स्वायसत्तेवर घाला घातल आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, अशी अपेक्षाही अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलिस दलाची क्षमता व शौर्य याची वाहवा संपूर्ण जगभरात असताना 20 जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे, हे अर्श्चयच आहे. सचिन वाझे यांचे काही चुकलेच असेल, ते गु.न्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर का.रवाई करण्यास मुंबई पोलिस मुंबई पोलिस आणि दह.शतवादविरोधी पथक सक्षम होते. पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊन द्यायचे नव्हते.

दरम्यान, सचिन वाझे यांना शिवसेनेचा आश्रय आहे. म्हणूनच राज्यात बेकायदेशीर कामं सुरु आहेत. वाझेंच्या जीवावरच शिवसेनेकडून लोकांना ध.मक्या दिल्या जात आहेत. तसेच वाझे आणि शिवसेना नेत्यांमध्ये संबंध असल्याचा आ.रोप नारायण राणे यांनी केला आहे.

तसेच ज्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि परिषदेत सचिन वाझे ओसाना बीन लादेन आहे का, असा शब्द प्रयोग केला होता. त्या मुख्यमंत्र्यांनी देखील नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी देखील भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर जिवघेणा ह.ल्ला, प्रकृती गंभीर!

“कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून ठाकरे मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत”

महेंद्रसिंग धोनीने सांसारिक मोह मायेपासून संन्यास घेतला? फोटो व्हायरल

….म्हणून या बड्या अभिनेत्रीने भर स्टेजवर कपडे काढले; कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; भाजपच्या ‘या’ नेत्यानं केली मागणी