पवनदीपच्या खासगी गोष्टीचा अरुणीताकडून खुलासा, म्हणाली…

मुंबई | देशातील गाण्याचं सर्वात मोठं स्टेज समजल्या जाणाऱ्या ‘इंडियन आयडॉल’च्या बाराव्या पर्वाचा नुकताच अंत झाला आहे. हे पर्व नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस पडलं होतं. इंडियन आयडॉलचे हे पर्व संपले तरी देखील प्रेक्षकांच्या मनात अद्याप या शोची जादू आहे.

या पर्वातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांवर जणू जादूच केली होती. इंडियन आयडॉलच्या बाराव्या पर्वाचा विजेता पवनदीप राजन आणि अरुणीता कांजीलाल हे या पर्वातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार ठरले. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली.

तसेच या दोघांच्या नात्याबद्दल देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जातं होतं. मात्र, दोघांनीही या गोष्टीला नकार देत आपण फक्त चांगले मित्र असल्याचं स्पष्ट केलं होतं.

शो संपल्यानंतर नुकतेच अरुणीता आणि पवनदीप एका म्युझिकल सिरीजच्या टीझर लाँचिंगसाठी गेले होते. यावेळी या दोघांसोबत शनमुखपरिया देखील होती. या तिघांना या कार्यक्रमात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. तिघांनीही यावेळी बिनधास्तपणे उत्तरं दिली.

तिघांमध्ये शॉर्ट टेम्पर्ड कोण आहे? असा सवाल यावेळी तिघांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना अरुणीताने पवनदीपचं नाव घेतलं. यानंतर पवनदीप अरुणीतावर चांगलाच संतापला.

मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, हे तुला कसं माहीत? असा सवाल पवनदीपने अरुणीताला केला. त्यानंतर अरुणीता त्यावर स्पष्टीकरण देत राहिली. मात्र, या गोष्टीचा पवनदीपला चांगलाच राग आला.

दरम्यान, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. इंडियन आयडॉलच्या या पर्वाचा विजेता पवनदीप सध्या अनेक नवीन अल्बम्सवर काम करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

मी आता केक कापणार नाही तर…; बर्थडेवरून भडकलेल्या गर्लफ्रेंडने उचललं ‘हे’ पाऊल; व्हिडीओ व्हायरल

सेटवर राखीला चावला कुत्रा, राखी म्हणतेय मी देखील त्याला चावणार; पाहा व्हिडीओ

रिंकू राजगुरुचा आपल्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…

धक्कादायक! बिग बाॅसच्या घरात हाणामारी, घरातून स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता

कोरोना काळात ‘अशी’ वाढवा लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती!