केंद्राची दिल्लीकरांना सावत्रपणाची वागणूक; केजरीवाल भडकले

नवी दिल्ली |  केंद्र सरकारकडून देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र या बजेटमधून दिल्लीला विशेष असं काही मिळालं नाही. केंद्र सरकारकडून पुन्हा दिल्लीला डावलण्यात आलं असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

आजच्या अर्थसंकल्पाकडून दिल्लीच्या जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र केंद्र सरकारने त्यांचा अपेक्षाभंग केला आहे. पुन्हा एकदा दिल्लीवाल्यांला सावत्रपणाची वागणूक दिली असल्याची बोचरी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपने दिल्लीच्या जनतेच्या पदरी निराशा दिली आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर ते दिलेले वचन पूर्ण करतील यावर कसा विश्वास ठेवावा?, आणि भाजपला मतदान का करावं, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातूनही मोदी सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे..

 

महत्वाच्या बातम्या-

-येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस

-महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीसाठी संशोधन केंद्र उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-आदिवासींच्या गरीबीची चेष्टा करू नका; किरीट सोमय्यांना आव्हाडांनी दिलं सडेतोड उत्तर

-सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; मनसेकडून मोदी सरकारचं कौतुक

-“तब्येत बिघडल्याने 2 पानं वाचायची राहिली… नाहीतर लोकांच्या डोळ्यात आणखी धुळफेक झाली असती”