“मनीष सिसोदियांना अटक केली, तर आम्ही गुजरातमध्ये…” अरविंद केजरीवाल यांचा दावा

दिल्ली | दिल्ली विधानसभेत सत्ताधारी आम आदमी पक्षाने (AAP) विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. या ठरावात केजरीवाल सरकारच्या बाजूने 59 मते पडली तर विरोधात शून्य मते पडली आहेत.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत भाषण दिले. यावेळी त्यांनी भाजपशासित केंद्र सरकार आणि केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे.

यावेळी त्यांनी दिल्लीचे शिक्षणमंत्री आणि सध्या सीबीआयच्या चौकशीत अडकलेले मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याविषयी भाष्य केले. मनीष सिसोदिया यांना जर का अटक केली तर, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येईल, असे केजरीवाल म्हणाले.

सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकल्याने गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचा जनाधार चार टक्क्यांनी वाढला. मनीष सिसोदिया यांना अटक केली, तर तो चार टक्का सहा टक्क्यांवर जाणार आहे.

आपच्या आमदारांवर आणि खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत देखील केजरीवालांनी यावेळी भाष्य केले. केजरीवाल म्हणाले, माझ्यावर 16 गुन्हे दाखल आहेत.

त्यापैकी 12 गुन्ह्यांतून माझी निर्दोष मुक्तता झाली आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर 13 गुन्हे दाखल असून 10 मधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. दिनेश मोहनियांवर 10 खटले असून 9 खटल्यांतून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

आपच्या 49 आमदारांवर गुन्हे आहेत. त्यांची यादी देखील आमच्याकडे आहे. प्रत्येक कामांत भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल होतात. पण त्यातील एकही सिद्ध होत नाही, असे केजरीवाल म्हणाले.

भाजपला वाटते की ते आमचे सर्व आमदार विकत घेऊ शकतात. पण आमचे आमदार विकले जाणार नाहीत. असा दावा केजरीवालांनी केला. तसे आमच्या आमदारांना विकत घेण्यासाठी त्यांनी 800 कोटी रुपये तयार ठेवले होते. तर 12 आमदारांना प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर दिली होती.

महत्वाच्या बातम्या –

“बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असल्याचे सांगून किती दिवस…”; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर मोठी टीका

“शहाजी बापू पाटील पन्नास खोक्यांतून तुमच्या बायकोला…”; युवासेनेची बापुंना प्रतिक्रिया

काँग्रेसचा नवीन अध्यक्ष महाराष्ट्रातून? नाना पाटोलेंसह ‘या’ नेत्यांच्या नावाची चर्चा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मेळघाट दौरा गाजतोय, फोटो सोशल मिडियावर व्हायरल

Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे ताजे दर