मैं अरविंद केजरीवाल…..शपथ लेता हूँ की, रामलीला मैदानावर आज आवाज घुमणार

नवी दिल्ली |  भारतीय जनता पक्षाला आणि काँग्रेसला धूळ चारत दिल्लीच्या विधानसभेत आपणच राजा असल्याचं सिद्ध केलेल्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सकाळी रामलीला मैदानावर 10 वाजण्याच्या सुमारास ते शपथ घेतील.

अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीसाठी तमाम दिल्लीकरांना आमंत्रण देण्यात आलं आहे. केजरीवालांच्या शपथविधीसाठी 1 लाख लोकं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खास सुरक्षा व्यवस्था देखील तैनात केली गेली आहे.

त्यांच्या शपथविधीसाठी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. तसंच दिल्ली भाजपच्या सगळ्या सातही खासदारांना देखील आमंत्रित केलं गेलं आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आपचे 6 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मनीष सिसोदीया तसंच आतिषी यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्य़ा-

-पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवली जाणं चुकीचं आणि दुर्दैवी- सुप्रिया सुळे

-मुलींनी प्रेम करु नये हे समाजाने का ठरवावे… त्यांच्या भावनांचं काय??- सुप्रिया सुळे

-भाजप नेत्याने पुष्पहार घातला म्हणून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं केलं गंगाजलाने शुद्धीकरण!

-इंदुरीकर महाराज थोडा संयम ठेवा, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत- नितीन बानुगडे पाटील

-भाजपला मोठा धक्का बसणार? या खासदाराची खासदारकी जाण्याची शक्यता