नवी दिल्ली | भाजपला चारी मुंड्या चित करत दिल्लीत आम आदमी पक्षाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्लीकरांसमोर अतिशय भावूक पण तितकंच कणखर भाषण केलं.
भारत माता की जय…. इन्कलाब जिंदाबाद… अशा घोषणांनी केजरीवालांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. उपस्थितांनी देखील त्यांना यावेळी मोठा प्रतिसाद दिला.
अरविंद केजरीवाल म्हणाले-
मेरे प्यारे दिल्लीवासिंयो… नमस्कार प्रणाम… आपल्या मुलाने तिसरी वेळ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. ही माझी जीत नाहीये.. ही प्रत्येक दिल्लीकराची जीत आहे… ही दिल्लीच्या प्रत्येक आईची जीत आहे. दिल्लीच्या प्रत्येक बहिणीची जीत आहे. दिल्लीच्या प्रत्येक विद्यार्थ्याची जीत आहे. दिल्लीतल्या प्रत्येक परिवाराची जीत आहे. पाठीमागच्या 5 वर्षांपासून आमचा हाच प्रयत्न आहे की दिल्लीतल्या प्रत्येक परिवाराला दिलासा कसा मिळेल. आज तुम्ही आपल्या परिवाराला सांगा की आज आपल्या मुलाने तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये.
आताच निवडणुका झाल्या आहेत. काहींनी ‘आप’ला मतदान दिलं. काहींनी भाजपला मतदान दिलं. काहींनी काँग्रेसला मतदान केलं. पण आज मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. तर मी आजपासून प्रत्येक दिल्लीकरांचा मुख्यमंत्री आहे, असं त्यांनी म्हणताच उपस्थितांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला.
पाठीमागच्या 5 वर्षांत मी भाजप कार्यकर्त्यांचं काम आहे…. किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काम आहे म्हणून मी ते काम रोखून धरलं नाही. मी सगळ्यांची कामं केली. मला भाजपचा मौहल्ला माहिती पडला… मी त्या भागात रस्ता केला… पाणी दिलं सगळ्या सोयीसुविधा दिल्या. म्हणूनच त्यांनी मला मतदान केलं, असं केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या 6 नेत्यांनी देखील थपथ घेतली. यामध्ये मनीष सिसोदीया, सतेंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन आणि राजेंद्र गौतम या नेत्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-अरविंद केजरीवालांनी दिल्लीकरांच्या साक्षीने घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
-आता नरेंद्र मोदी ‘केम छो ट्रम्प’ नाही तर ‘नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प’ बोलणार!
-सॅमसंगचे ‘हे’ तीन 3 स्मार्टफोन 12 हजार रूपयांपर्यंत झालेत स्वस्त!
-चंद्रकांत पाटील, पवारसाहेबांना ओळखायला तुम्हाला 10 जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे
-फिल्म इंडस्ट्री नेहमी सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहिलेली आहे- नसिरूद्धीन शाह