नवी दिल्ली | गोली मारो पासून सुरू झालेल्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देताना दिल्लीकरांनी विधानसभेच्या 70 पैकी 62 जागांवर आम आदमी पक्षाला विजयी केलं. आज सकाळी आपच्या सगळ्या आमदारांनी अरविंद केजरीवाल यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली आहे. त्यानंतर केजरीवालांच्या शपथविधीची तारीख आणि मैदानही ठरलं आहे.
अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारी रोजी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची थपथ घेतील. रामलीला मैदानावर केजरीवालांचा हा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केजरीवालांच्या शपथविधीला दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असं आवाहन केलं आहे. आपला भाऊ, आपला मुलगा शपथ घेणार आहे त्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद द्या… प्रेम द्या… असं सिसोदिया म्हणाले आहेत.
दरम्यान, केजरीवालांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच देशभरातल्या प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मराठवाड्याच्या पाणी योजनेवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!
-दिल्लीत नेस्तनाबूत झालेल्या काँग्रेस नेत्यांना राजीनामा देण्याची घाई; मतभेद चव्हाट्यावर
-BSNLचा खासगी टेलिकॉम कंपन्यांना दणका; आता 96 रुपयात महिनाभर रोज मिळणार 10GB 4G डाटा
-दिल्लीत जंग-जंग पछाडून भाजप पराभूत; पाकिस्तानात काय प्रतिक्रिया??