‘8 वर्ष देश चालवल्यानंतर पंतप्रधानांना…’; केजरीवालांनी भाजपला झाप झाप झापलं

नवी दिल्ली | देशात सध्या ‘द काश्मीर फाईल्स’वरून जोरदार राजकारण पेटलं आहे. केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

दिवसेंदिवस हा चित्रपट कमाईच्या बाबतीत नवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे. विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट देखील घेतली.

भेटीनंतर मोदींनी चित्रपटाची स्तुती करताना विरोधकांवर टीका केली होती. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे.

दिल्लीमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर अरविंद केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत भाजपवर जोरदार टीका केली आहे.

8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावं लागत तर याचा अर्थ 8 वर्षात पंतप्रधानांनी काहीही काम केलं नाही, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.

केजरीवाल यांनी बऱ्याच दिवसानंतर मोदींविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केल्याचं दिसत आहे. पंजाबच्या विजयानंतर आता आप भाजपला इतर राज्यात टक्कर देण्याची योजना आखत असल्याचं आपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, विवेक अग्निहोत्रींना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यावरूनही मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यावरून विरोधक केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…

  “दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”

  पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…

करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ!