अरविंद सावंत यांना लॉटरी; मंत्रिपदाचा मिळाला दर्जा!

मुंबई | महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी संसदीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील संसद सदस्यांची बैठक झाली होती. यावेळी केंद्र सरकारकडून प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा करण्यात आली होती. या प्रस्तावांचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

समितीचे अध्यक्ष सावंत यांचं कार्यालय नवी दिल्ली महाराष्ट्र सदन येथे असणार आहे. त्यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही नवी दिल्लीतील सचिव तथा निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन यांच्याकडे असणार आहे.

दरम्यान, शिवसेना भाजपमध्ये महाराष्ट्रात झालेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता.

महत्वाच्या बातम्या- 

-शपथविधी सोहळ्यासाठी केजरीवालांनी दिली मोदींना आमंत्रणाची हाक!

-कार्यकर्त्यांनो थोडं दमांनं घ्या; …नाहीतर बायको मला घरातून हाकलून देईल- अजित पवार

-व्हॅलेंटाईन डेला अशोक चव्हाण रंगले प्रेमरंगात; ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’ हे गायलं गाणं

-शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उभारली जाणार; अजित पवारांची घोषणा

-शंकररावांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप विलासराव देशमुखांनी केलं होतं- अशोक चव्हाण