मुंबई | भाजप विरोधात विरोधकांची मोट बांधण्याच्या उद्देशाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबईत आल्या होत्या. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांचं ट्रायडेंट हॉटेलमध्ये जाऊन स्वागत केलं होतं.
मुख्यमंत्री रुग्णालयात असल्याने त्यांची ममता बॅनर्जींसोबत भेट होऊ शकली नाही. पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरुन भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आम्ही महाराष्ट्राच्या (Maharashtra) संस्कृतीनुसार एका महिलेचा सन्मान ठेवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचं स्वागत केलं. भाजप अभिनेत्री कंगना रनौत बद्दल कशी वागली ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे भाजपने (BJP) आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी भाजपला सुनावलं आहे.
कंगना रनौतचं तुम्ही ज्या पद्धतीने स्वागत केलं त्यापेक्षा हे स्वागत नक्कीच चांगलं आहे. कुणाचं आणि कोणत्या विषयासाठी स्वागत करावं हे महत्त्वाचं आहे, असं ते म्हणालेत.
ममता बॅनर्जी या एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. ज्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने घवघवीत यश मिळवलंय. विशेष म्हणजे भाजप प्रचंड मोठ्या ताकदीने उतरला असताना सुद्धा इतकं मोठं यश त्यांनी संपादीत केलं, असंही अरविंद सावंत म्हणालेत.
लाल-बाल-पाल अशी आमची स्वतंत्र चळवळीतील जुनं नाते आहेत. अशापद्धतीने एखादी महिला राज्याची मुख्यमंत्री, यशस्वी महिला धाडसी महिला राज्यात येते त्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं याचं दु:ख होणं हे मला आश्चर्यकारक वाटतं. तुम्हाला कंगना रनौतच्या स्वागताला वाईट वाटायला हवं होतं, असा टोला सावंत यांनी लगावला.
दरम्यान, मुंबईत घनदाट वस्तीच्या झोपड्या आहेत. त्यामुळे त्या घनवस्तीत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढण्याची शक्यता होती. पण मुख्यमंत्र्यांनी ज्यापद्धतीने धारावी, कोळीवाडा, कुलाबा अशा अनेक भागांमध्ये जे काम केलं त्याचं कौतुक जगभरात झालं, असंही अरविंद सावंत म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पुढील 2 आठवडे भारतासाठी खूप महत्वाचे’; Omicron बाबत तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती
प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला स्पष्टच सांगितलं, ‘तुमचा 10 वर्षात 90 टक्के पराभव झालाय त्यामुळे…’
“लस प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो छापता तर लोकांच्या मृत्यूची जबाबदारी देखील घ्या”
देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; केंद्र सरकारचं मोठं वक्तव्य
9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांना, लाखाचे झाले असते 72 लाख