आर्यन खानला अखेर जामीन मिळाला; उद्या तुरुंगातून बाहेर येणार?

मुंबई | एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.

आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. मात्र जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. यात कोणताही कट नव्हता. तसेच आर्यन आणि अरबाज जहाजावरील कुणालाही ओळखत नव्हते. त्यामुळे या प्रकरणात कट होता असं म्हणता येणार नाही, असंही आर्यनच्या वकिलांनी सांगितलं आहे.

आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर झाला आहे. निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असं मुकूल रोहतगी यांनी सांगितलं आहे .

महत्वाच्या बातम्या-

“पुढील अनेक दशकं भाजप पक्ष भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू असेल”

‘या’ मंगळसुत्राच्या जाहिरातीवर नेटकरी संतापले; सब्यसाचीची जाहिरात चर्चेत

‘पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला टोला

“भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा”

उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?- क्रांती रेडकर