आर्यनला सोडवण्यासाठी जुही चावला धावली, अशी केली शाहरुखला मोठी मदत

अभिनेता आणि बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजुर केला. 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने आर्यन खानला ताब्यात घेतलं होते. तर 8 ऑक्टोबरपासून तो मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात होता. आर्यनच्या जामीन पत्रावर शाहरुख खानची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावलाने सही केल्याची माहिती समोर आली आहे.

सेशन्स कोर्टात जुही चावला हजर होती. यावेळी वकील सतीश मानेशिंदे सुद्धा तिच्यासोबत होते. जुहीचे पासपोर्ट, आधार कार्ड कागदपत्रांसोबत जोडण्यात आले आहेत. न्यायमूर्तींनी जुहीची सर्व कागदपत्रे तपासली तेव्हा ती आर्यनला जन्मापासून ओळखते. त्यामुळे आर्यनसाठी जामीनदार म्हणून जुही चावलाने सही केली आहे. 

जामीनाची कागदपत्रे आर्थर रोड कारागृहाचील अधिकाऱ्यांना लवकरच मिळतील आणि त्यानंतर आर्यन तुरुंगाबाहेर येईल. अशी माहिती समोर आली आहे. जामीनासाठी काय अटी ठेवल्या आहेत?

आर्यन कोणत्याही आरोपाशी संपर्क साधू शकणार नाही -आर्यन खानने पुराव्याशी छेडछाड करू नये -आर्यनला त्याचा पासपोर्ट स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करावा लागेल -कोणत्याही माध्यमांशी बोलता येणार नाही -न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याला देश सोडता येणार नाही -त्याला आवश्यकतेनुसार एनसीबीला सहकार्य करावे लागेल

-कोणतेही उल्लंघन केल्यास त्याचा जामीन रद्द होण्यास पात्र आहे आर्थर रोड कारागृहाच्या प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता जेवणाच्या वेळी आर्यनला जामीन मिळाल्याची माहिती देण्यात आली.

जामिनाची बातमी ऐकून आर्यन खूश झाला आणि तुरुंगातील कर्मचाऱ्यांचे त्याने आभार मानले. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर तो मन्नतवर जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.