तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! शंभरीपार आजी-आजोबांनी सांगितली यशस्वी वैवाहिक जीवनाची सूत्र, पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्याच्या आधुनिक जगात आपण पाहतो की अनेकांच्या सांसारिक जीवनामध्ये काहीना-काही, कोणतेना-कोणते प्रॉब्लेम्स सुरू असतात. छोट्या कारणावरून झालेली भांडणं डायरेक्ट घटस्पोटपर्यंत पोहचतात. विशेष म्हणजे त्यातील काही कराणं ही बिनबुढाची असतात. त्यांना कुठलाच अर्थ नसतो. तरीही तरूण-तरूणी ते त्यांचं लग्न त्या एका कारणावरून कायम स्वरूपी संपवायचा प्रयत्न करतात.

आधीच्या काळी असं काही नसायचं. मुलगा-मुलगी एकमेकांना डायरेक्ट लग्नांत पाहायचे तेही एकटक नाहीतर ओझरत्या नजरेने. घरची मोठी मंडळी ज्या मुलाबरोबर विवाह ठरवतील, त्याला निमूटपणे होकार देऊन त्यांच्याशी लग्न करायचे. असं असतानाही आधीच्या काळी झालेल्यांच्या वैवाहीक जीवनामध्ये कधीच कोणत्या प्रकारचे गैरसमज किंवा भांडण नसायची.

ते नेहमी एकमेकांना समजून घेत. अशाच एका शंभरीपार आजी-आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ तरूणांमध्ये तर जास्तच लोकप्रिय झालेला पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमधील आजी- आजोबांच्या लग्नाला 72 वर्ष पूर्ण झाले असल्याचं समजत आहे. आजीचे वय 90 वर्षे आहे आणि आजोबा 101 वर्षांचे आहेत.  ते दोघं त्या व्हिडीओमध्ये यशस्वीरित्या वैवाहिक जीवन कसं जगायचं याची सूत्र, काही महत्वाच्या गोष्टी सांगत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

व्हिडीओमध्ये आजी-आजोबा एका खुर्चीवर बसलेले आहेत आणि ते एक-एक सूत्र सांगताना दिसत आहे. सूत्र सांगताना ते एक्शनही करून दाखवत आहेत त्याचबरोबर एक-एक सूत्र लिहिलेली पाटीही मध्ये येतं आहे.

तसेच हे सगळं सुरू असताना बॅकराऊंडला बर्फी चित्रपटामधलं ‘इतनी सी हसी इतनी सी खुशी’ हे गाणं सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ ऑफिशियल ह्युमन्स या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ‘What makes it works?  72 years and counting, this copule spills their secreats’ असं कॅप्शन दिलं आहे.

तसेच हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून, या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास 10 लाख लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर या व्हिडीओ पाहून अनेकांनी त्या आजी-आजोबांचं कौतुक करत त्यांना लग्नांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या-

बाॅलिवूडला कोरोनाचं ग्रहन! आणखी एक अभिनेत्री कोरोनाच्या…

तरूणाने केला हवेत खतरनाक स्टंट, व्हिडीओ पाहून तुमच्याही…

केस कापताना तो ओक्साबोक्सी रडू लागला, व्हिडीओ पाहून तुम्ही…

अजून बोलताही येत नाही तोच पोरगं म्हणतंय गाणं, पाहा…

मंदिराच्या दानपेटीत टाकला होता कंडोम, एक रक्ताच्या उलट्या…