मुंबई | गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास आर्थिक घोटाळाप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे. तसेच त्यांनी या घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली आहे, असा त्यांच्यावर आरोप आहे.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनी संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पैसे टाकले आहेत. त्यामुळे सध्या संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर ईडीचा तपास सुरु आहे.
आता पत्राचाळ घोटाळ्यापाठोपाठ संजय राऊतांचे नाव चीट फंड घोटाळ्यात देखील आले आहे. 60 हजार कोटी रुपयांच्या देशव्यापी घोट्याळ्याप्रकरणी सध्या ईडी (Enforcement Directorate) त्यांची चौकशी करत आहेत. या पैश्यातून त्यांनी वसई, विरार आणि पालघर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्याचे ईडीचे आरोप आहेत.
21 मे 2022 रोजी ईडीने पर्ल ग्रुपवर छापेमारी करत वसई येथील 187 कोटी रुपये किंमतीची 57 एकर जमीन जप्त केली. 60 हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील 2 हजार कोटी रुपये संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांना मिळाल्याचा ईडीला संशय आहे.
या व्यवहरात संजय राऊत यांना देखील आर्थिक लाभ झाल्याचे ईडीचे मत असून त्यांचा तपास सुरु आहे. पत्राचाळीची जागा आठ बिल्डर्सना विकली आहे. या व्यवहारातून आशीष कन्स्ट्रक्शनला 1039 कोटीचा लाभ झाल्याचे ईडीचे मत आहे.
प्रवीण राऊत, राकेशकुमार वाधवान, सारंगकुमार वाधवान यांच्याविरोधात तक्रारी दाखल होत्या. फेब्रुवारी 2020 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना अटक देखील केली होती. सप्टेंबरमध्ये सारंग वाधवान यांना अटक करण्यात आली होती.
एकंदर 47 एकर जागेत असलेल्या या जागेवर पत्राचाळीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया 2007 साली सुरु करण्यात आली होती. या कामाचे कंत्राट म्हाडाने गुरू आशीष (Guru Ashish) या प्रवीण राऊत संचालक असलेल्या कंपनीला देण्यात आले होते.
या जागेवर पुनर्विकासाचे काम न करता गुरू आशीष कंस्ट्रक्शनने ही जागा खासगी बिल्डरला विकली असल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. यातील काही व्यवहार रोख झाल्याचे ईडीच्या निदर्शनास आले आहे.
याप्रकरणी संचलनालयाने संजय राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचे धागेदोरे राऊत यांच्या कुटुंबीयांपर्यंत देखील जात असल्याचे ईडीचे म्हणने आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘लवकरच भाजपचे बुरे दिन येणार’, राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे आक्रमक
शिवसेनेबाबत जे पी नड्डांचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी! संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
“कुठल्या तोंडाने सांगू घात झाला, तो पण आपल्या माणसाने केला”
संजय राऊतांच्या अटकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…