कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच राजकारण तापलं! ‘या’ बड्या नेत्याने दिला सावधानतेचा ईशारा

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांसह महाविकास आघाडीतील अनेक नेते सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर दिसत आहेत. नुकतंच भिवंडी निजापूर महानगर पालिकेतील कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

एकसाथ 18 नगरसेवकांनी पक्षांतर करताच काँग्रेस प्रदेश महासचिव विनायकराव देशमुख यांनी आपल्या पक्षकार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. विनायकराव देशमुख यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना सावधानतेचा ईशारा दिला आहे.

ही घटना साधी नाही. ही घटना सावधानतेचा ईशारा देणारी आहे. नाही तर उद्या परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. केवळ महाविकास आघाडीत सहभागी होऊन मंत्रिपद मिळाल्याने पक्षाने समाधानी राहू नये, असं विनायकराव देशमुख यांनी म्हटलं आहे.

या पत्रात पुढे विनायकराव देशमुख म्हणाले की, काँग्रैस नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याबद्दल राज्याच्या समन्वय समितीत राष्ट्रवादीला त्याचा जाब विचारला पाहिजे. नाही तर आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक नुकसान सोसावं लागेल.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नुकतेच शिवसैनिकांशी जुळवून घ्यायला सांगितलं आहे. त्यानंतर काँग्रेस नगरसेवकांना राष्ट्रवादीत सामिल करून घेतले आहे. हा निव्वळ योगायोग नाही, हे लक्षात असू द्या, असंही देशमुख यांनी या पत्रातून पक्षकार्यकर्त्यांना सूचित केलं आहे.

अशाप्रकारे या 18 नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. विनायकराव देशमुख यांनी कॉंग्रेसच्या पक्षकार्यकर्त्यांना लिहिलेल्या या पत्रानंतर राष्ट्रवादी नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अलीकडे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत महाभारती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपमध्ये गेलेले अनेक नेते येत्या काळात राष्ट्रवादीत  परततील, असे संकेत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिले आहेत. येत्या काळात राष्ट्रवादीत मेगा भरती होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला मोठं खिंडार! आणखी एका बड्या महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

“मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच त्याबरोबर पैसा, उत्पादनाला हमीभाव आणि…”

मोठी बातमी! अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल, जडला ‘हा’ गंभीर आजार

“शरद पवार तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे”

ममता बनर्जींला मोठा धक्का! पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसची मोठी राजकीय खेळी