सुशांत प्रकरणी करण जोहरचं नाव समोर येताच कॉंग्रेस नेत्यांचा फडणवीसांवर हल्लाबोल!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अचानक झालेल्या मृ.त्युनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. बॉलीवूड इंडस्ट्रीसह देशातील राजकारण देखील चांगलंच तापलं होतं. सुशांत प्रकरणावरून अनेक राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते.

सुशांत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक धक्कादायक वळणं प्राप्त झाली आहेत. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो देखील याप्रकरणी तपास करत आहेत. आत्तापर्यंत अनेक दिग्गजांची नावे याप्रकरणी समोर आली आहेत.

नुकतंच एनसीबीनं निर्माता दिग्दर्शक करण जोहर याला देखील अं.मली पदार्थ प्रकरणी समन्स बजावला आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी करण जोहरचं नाव पुढे येताच आता कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

करण जोहरच्या घरच्या पार्टीचा व्हिडीओ 2019 मध्ये व्हायरल झाला होता. त्यावेळी फडणवीस सरकार होते. मग त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी असे फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला का वाटले नाही? असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे.

तसेच सचिन सावंत पुढे म्हणाले की, राष्ट्रीय तपास यंत्रणा या भाजप सरकारच्या हातच्या बाहुल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर त्या नाचत आहेत हे सतत स्पष्ट होत आहे. एनसीबी, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या राष्ट्रीय तपास यंत्रणा सिलेक्टिव्ह चौकशी करताना दिसत आहेत.

एका पार्टीच्या व्हिडीओवरून करण जोहरची चौकशी होऊ शकते. मग कंगणाच्या चौकशीची हिम्मत एनसीबी का दाखवत नाही. तिचाही ड्र.ग्ज संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात एनसीबीचा काय स्वार्थ असावा. करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ 2019 चा आहे. त्यावेळी गृहमंत्री फडणवीस होते. त्यांनी यावर खुलासा करावा, असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरातील एका पार्टीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अनेक दिग्गज कलाकार नशेत दिसत होते.

या पार्टीत अं.मली पदार्थांचा वापर झाल्याचं अनेकांचं म्हणनं आहे. यामुळे याबद्दल काही प्रश्न विचारण्यासाठी एनसीबीनं करण जोहरला समन्स बजावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

5 आणि 10 रुपयांची ही नाणी विकून तुम्हीही कमवू शकता लाखो रुपये, वाचा सविस्तर

तुमच्यात ‘ही’ 5 लक्षणे दिसत असतील तर तुम्हालाही कोरोना होऊन गेलाय, असं समजा

…अशा प्रकारे भाजपचे आमदार फुटणार; अजित पवारांनी सांगितला ‘तो’ फॉर्म्युला

“शरद पवारांचा पंटर, खबऱ्या आणि चमचा…”

ईशाने बाथरूम मधून शेअर केला ‘तो’ पर्सनल फोटो, सोशल मीडियावर झाली ट्रोल; पहा फोटो