राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस मिळताच फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…

सांगली | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने काल नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पीएमसी घोटाळा प्रकरणी नोटीस बजावली आहे.

पत्नीला मिळालेल्या ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून काही गाण्याच्या ओळी शेअर करत अप्रत्यक्षपणे थेट आवाहन केलं होतं. ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया’, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं. अशातच आता संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत सतत ट्वीट करत असतात. त्यांच्यामध्ये खूप प्रतिभा आहे. त्यांना अनेक शेर गाणी पाठ आहेत. राऊत यांना काही काम नसतं तेव्हा ते शेर आणि गाणी लिहित असतात. त्याच्यावर मी उत्तर कशाला देवू? मी काय ईडी प्रवक्ता नाही त्यांनाच जावून विचारा, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

तसेच  संजय राऊतांच्या पत्नीला मिळालेल्या ईडीच्या नोटीसवर बोलताना फडणवीस म्हणाले की, कोणी चांगलं काम केलं तर त्याला नोटीस मिळत नाही. चूक नसेल तर घाबरायचं काम नाही. काल फडणवीस सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना देखील ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या वर्षाच्या शेवट म्हणजे 30 डिसेंबरला खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर राज्यभरातून केंद्र सरकार विरोधात विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सीबीआय आणि ईडीला कोर्टात खेचण्याचा पवित्रा उचलला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पत्नीला ईडीची नोटीस मिळताच राऊतांची मोठी प्रतिक्रिया! गाण्याचे बोल लिहित थेट केलं आवाहन, म्हणाले…

‘शिवसेनेनं आम्हाला सल्ला देवू नये’; अशोक चव्हाणांचा संजय राऊतांवर हल्लाबोल!

“देशात भाजपची तानाशाही सुरु आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं”

‘…मग ठाकरे सरकारविरुद्ध आंदोलन करा’; राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य!

स्वस्तात सोनं खरेदी करायचं आहे, तर मग हीच आहे सुवर्णसंधी! 28 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंतच आहे ‘ही’ योजना