बिल्कीस बानो प्रकरणावर ओवैसी संतापले; म्हणाले, ‘नशीब नथुराम गोडसेला तरी…’

नवी दिल्ली | बिल्कीस बानो (Bilkis Bano) प्रकरणावरुन आता देशात मोठ्या वादांना सुरुवात झाली आहे. 2002 सालच्या गुजरात दंगलीवेळचे (2002 Gujarat Riots) बिल्कीस बानो प्रकरण आता पुन्हा डोके वर काढत आहे.

बिल्कीस बानो प्रकरणातील 11 दोषींची गुजरात न्यायालयाने सुटका केल्यावर देशभरातून न्यायालयाच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. या 11 दोषींच्या सुटकेची कारवाई मागे घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

बिल्कीस बानो प्रकरणात भाजपचे आमदार सी. के. राहुल (C. K. Rahul) यांनी भाष्य केले होते. या प्रकरणातील दोन ब्राम्हण असून त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत आणि त्यांची वागणूक चांगली आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

त्यांचा आता एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी भाजप आमदार यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.

गुजरात असो वा कठुआ अत्याचार करणाऱ्या लोकांच्या पाठिशी उभे राहणे ही भाजपची निती आहे. काही लोकांच्या जाती त्यांना अपराध करुन देखील मोकाट सोडतात. तर दुसरीकडे जातीच्या नावावर काहींना अनेक वर्षे तरुंगात ठेवले जाऊ शकते, असे ट्विट ओवेसींनी केले आहे.

तर दुसरीकडे त्यांनी दोषींची सुटका केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. नशीब नथुराम गोडसेला (Nathuram Godase) तरी फासावर लटकवले अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) आदेशानुसार गुजरात न्यायालयाने बिल्कीस बानो प्रकरणातील अकारा दोषींची त्यांनी 14 वर्षांची शिक्षा पूर्ण केली म्हणून सुटका केली आहे. तशा प्रकारची याचिका एका दोषीने केली होती.

महत्वाच्या बातम्या – 

कोकणातून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता

दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयची मोठी कारवाई

“शेतकरी विरुद्ध मोदी सरकार संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता”

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर देशभरात संताप व्यक्त!

संजय राऊतांबाबत ईडीच्या तपासात महत्त्वाची माहिती उघड