सोलापूर | राज्यात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा जोर धरताना पाहायला मिळत आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत.
सोलापूरमध्ये आज ओवैसी यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाचा मेळावा पार पडला. त्यावेळी ओवैसी यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
आपले कुटुंब वाचवण्यासाठी, घोटाळे लपवण्यासाठी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली आणि धर्मनिरपेक्षता जमिनीत गाडली असल्याची टीका एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असद्दुदीन ओवैसी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे.
शिवसेनेला तुम्ही धर्मनिरपेक्ष म्हणवता आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात, असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे. यावेळी ओवैसी यांनी मुस्लिम आरक्षणासाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी 11 डिसेंबर रोजी मुंबईत धडक देणार असल्याचं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं. मात्र, सत्ता स्थापन केली तेव्हा हेच पक्ष एकत्र आले आणि मुस्लिमांना धोका दिला असल्याचं म्हटलं. शरद पवार, राहुल गांधी यांनी शिवसेना किती धर्मनिरपेक्ष आहे हे सांगावं, अशी टीका ओवैसींनी केलीये.
तुम्ही सन 1992 मध्ये काय झालं हे विसरलेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणतात की, बाबरी मशिद आम्ही पाडली आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीला लाज वाटली नाही का?, असा खोचक सवाल ओवैसींनी केला आहे.
मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या मतांचा त्यांनी योग्य वापर करावा, असा सल्लाही ओवैसींनी यावेळी बोलताना दिला आहे.
केवळ तुमचा परिवार आणि कुटुंब वाचवण्यासाठी शिवसेनेसोबत आहात असं सांगत अजित पवार हे 48 तासांसाठी नवरदेव देखील झाले होते. फडणवीस आणि अजित पवार यांनी लग्न केलं. यामध्ये वधू कोण याची माहिती शरद पवार सांगतील, अशी बोचरी टीकाही ओवैसींनी केली आहे.
दरम्यान, तुमच्याकडे किती लोकांच्या खिशात पेन आहे? हीच परेशानी आहे मुसलमानांकडून. पेन ठेवा खिशात, लिहा. पेन ठेवा खिशात. तो तुम्हाला जिवंत ठेवेल, तलवार जिवंत ठेवणार नाही, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पदामुळे काही होत नाही…’; पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
“मला माफ करा, पवारसाहेब तुमच्यासाठी जीव देईन पण…”
“एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं”
“…अन्यथा सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरं जा”