नवी दिल्ली | बिल्किस बानो (Bilkis Bano) सामूहीक बलात्कार प्रकरणात जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेल्या 11 जणांची न्यायालयाने सुटका केली. त्याप्रकरणी एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी संताप व्यक्त केला आहे.
11 आरोपींना निर्दोष मुक्त केल्याप्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अशाप्रकारे मुक्त करणे, म्हणजेच तुमचा अमृतमहोत्सव का?, असे ओवेसी म्हणाले.
त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. महिला सन्मानाच्या वेळी भाजपला (BJP) मुस्लिम महिलांचा विसर पडतो, असा आरोप देखील ओवेसी यांनी केला.
बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची मुक्तता केल्यानंतर ओवेसी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आगपाखड केली. बिल्किस बानो यांच्यावर 11 जणांनी बलात्कार केला होता.
हे तेच 11 लोक आहेत, ज्यांनी पाच महिन्याच्या गर्भवती बिल्किस बानो यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. तिच्या 3 वर्षाय मुलीची हत्या केली होती. तिच्या कुटुंबियांची देखील हत्या केली होती.
तसेच अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्हातून भाजप सरकारने 11 जणांना मुक्त केले आहे. हा पंतप्रधान मोदी यांचा अमृतमहोत्सव आहे का? असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) या आरोपींच्या शिक्षेचे परिक्षण करा, असे आदेश दिले आहेत. त्यांना दोषमुक्त करुन त्यांची सुटका करा, असे म्हंटले नाही. हा भाजपचा न्याय चुकिचा आहे, असे ओवेसी म्हणाले.
भाजप जे निर्णय घेतो, ते धर्मावर आधारित आणि एकतर्फी असतात. आरोपींची सुटका करण्यासंदर्भात कायद्यात तरतुद आहे. परंतु अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातून सुटका करण्याची नाही, असे ओवेसी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
“बायको जेवढी फूगत नसेल तेवढे…” – सुप्रिया सुळे
“सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला?” अजित पवारांची आक्रमक पत्रकार परिषद, वाचा सविस्तर
देवेद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप
‘जन गण मन’ ऐवजी आता ‘या’ गीताला राष्ट्रगीत म्हणून घोषित करा – हिंदू महासंघ
काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळणार, जाणून घ्या कोण कोण आहे शर्यतीत?