मुंबई | राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी भाजपने सातवा उमेदवार दिल्यामुळे रस्सीखेच वाढली आहे.
शिवसेनेचे आमदार मुंबईत रिट्रीट हॉटेलमध्ये दाखल होत आहेत. भाजपने आपल्या आमदारांची ताज हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस आपल्या आमदारांना आज सुरक्षितस्थळी हलवणार आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून मतांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. अशात एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडीतर्फे कोणीही माझ्यासोबत किंवा आमच्या आमदारासोबत संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहू, असं ओवैसी म्हणालेत.
जर महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. गरज नसेल तर ठीक आहे आम्ही आमचा निर्णय घेऊ, असं ते म्हणाले.
आम्ही आमच्या आमदारांसोबत बोलत आहोत आणि एक किंवा दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“…अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल”
पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान
“शरद पवारांचं वय झालंय, त्यांनी आता घरी बसावं”
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाला नवं वळण; पुणे कनेक्शन समोर आल्याने खळबळ