“जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत या देशात राहणार”

मुंबई | नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधातील आंदोलनं ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आणि महात्मा गांधी यांचे विचार वाचवण्यासाठी आहे, असं मत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे.

आम्ही हे आंदोलन आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी करत आहोत. या संविधानाची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. त्यात आम्हाला अनेक अधिकार दिले आहेत, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत सीएए आणि एनआरसी विरोधातील सभेत बोलत होते.

जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत मी या देशात राहणार. ही लढाई बाबासाहेबांचं संविधान आणि गांधींचा विचार वाचवण्यासाठी आहे, असं ओवैसींनी म्हटलं.

दरम्यान, देशात कधीही धर्माच्या आधारावर भेदभाव  केला गेला नाही. मात्र सध्या भाजप कडून धर्माच्या नावावर देशाला विभक्त करण्याचा डाव सुरू आहे, असा आरोप असदुद्दीन ओवैसींंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-राज्यमंत्र्यांची ‘राहुटी आपल्या गावात’; बच्चू कडूंचा स्तुत्य उपक्रम

-दिल्लीच्या प्रचारासाठी गेलेल्या फडणवीसांची केजरीवालांवर जोरदार टीका; म्हणाले…

-वाघा बॉर्डरवर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणांनी आसमंत दुमदुमला; संभाजीराजेंचं ट्वीट

-देशाची संस्कृती टिकली ती शीख आणि मराठ्यांच्या तलवारीवर!- संभाजीराजे

-“वाचाळीवर राऊत…. पवारांची विठ्ठलाशी तुलना महाराष्ट्र सहन करणार नाही”