“भाजपने स्वत:च्या आनंदासाठी घटनात्मक वचनाचा घात केला”

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 बाबतच्या मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर जगभरातून प्रतिक्रिया दिल्या गेल्या. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी मोदी सरकारच्या धारेवर धरलं आहे. 

सरकारच्या निर्णयामुळे देशात दिवाळी साजरी होत असेल तर काश्मीरच्या जनतेलाही हा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडू द्या, असं म्हणत ओवैसींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

भाजप त्यांनी दिलेल्या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनपूर्तीसाठी काम करत आहे. ते घटनात्मक कर्तव्य पार पाडायला विसरत आहेत, असंही ओवैसी म्हणाले आहेत.

स्वत:च्या आनंदासाठी भाजपने घटनात्मक वचनाचा घात केला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतलेल्या निर्णयापेक्षा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अधिक शहाणपणाचा होता. इतिहासाची सुरवात कुठून झाली आणि शेवट कुठे झाला हे भाजप नाकारत आहे, असंही ओवैसींनी सांगितलं आहे.

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आनंद काश्मीरी जनतेला घेण्यासाठी त्यांनाही घराबाहेर पडू द्या. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व कैद्यांना तुरुंगातून सोडून द्यावं, असा टोला ओवैसींनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, येणाऱ्या काळात देशभरातून काश्मीरमध्ये प्रचंड स्थलांतर होणार आहे, असा अंदाजही ओवैसींनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“‘नाच्या’चं काम तुमचं नाही, तुम्ही पाण्याचं बघा”

-“भाजपची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा”

-काश्मीरबाबत बेजबाबदार वक्तव्य; गौतमने केली शाहीदची कानउघडणी

-भाऊ कदम आता नव्या रंगात अन् नव्या ढंगात येणार तुमच्या समोर!

-…हा तर सत्तेचा गैरवापर; राहुल गांधींची सरकारवर टीका