“भाजपचा फक्त जम्मू काश्मीरच्या जमिनीवर डोळा”

नवी दिल्ली : कलम 370 हटवल्यानंतर विरोधी पक्षांकडून आणि पाकिस्तान या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला.  त्यातच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही मोदी सरकारने काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयावरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरने भारतावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी भांडवलदारांचे हित साधणार अशी टीका केली होती.

भाजपला सत्तेत रहायचे आहे पण ते कायम सत्तेत राहू शकत नाही. भाजपला कश्मीरच्या जनतेबद्दल जिव्हाळा नाही. त्यांना फक्त कश्मीरच्या जमिनीत रस आहे, असा गंभीर आरोप ओवैसींनी केला आहे.  

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्याकडे जी दूरदृष्टी होती ती दूरदृष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही. पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशहिताला प्राधान्य देत निर्णय घेतले होते, असं ओवैसी म्हणाले.

मोदी म्हणतात शामा प्रसाद मुखर्जींचे विचार ते पुढे चालवत आहेत. प्रसाद मुखर्जींनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 ला पाठिंबा दिला होता, असा दावाही यावेळी ओवैसींनी केला होता. 

दरम्यान, मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. 

महत्वाच्या बातम्या-

-तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाय मला; नाना पाटेकरांची पूरग्रस्तांना मदत

-कलम 370 रद्द झाल्यावर भाजपला ‘अच्छे दिन’; सदस्यांची संख्या झपाट्यानं वाढली

-भारताचं मालिका विजयाचं लक्ष; आज तिसरी अंतिम लढत

-नारायण राणेंचा मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा???

-मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरु होणार