विखेंना शह; सत्यजीत तांबे यांची शिर्डीतून उमेदवारीची मागणी

अहमदनगर : विधानसभेच्या जिल्ह्यातील १२ जागांसाठी काँग्रेसकडे ४० इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली. काँग्रेसकडून 40 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींमध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त उमेदवार इच्छुक असल्याचं दिसून आलं.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले सत्यजीत तांबे हे बाळासाहेबांचे भाचे आहेत. त्यांना तिकीट मिळालं तर ते गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 

राधाकृण विखेंना शह देण्यासाठी बाळासाहेब यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचा आग्रह असलेल्या कर्जत-जामखेडवरील दावा मात्र काँग्रेसने कायम ठेवला आहे. 

निरीक्षक म्हणून पुणे येथील माजी आमदार मोहन जोशी आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 

संगमनेरमधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी इच्छुक उमेदवारी अर्ज भरला आहे. तर शिर्डी मतदारसंघातून सत्यजीत तांबे, राजेंद्र निर्मळ, एकनाथ गोंदकर, दत्तात्रेय खुळे, शिवाजीराव थोरात, श्रीकांत मापारी, लता लांडगे, मीनानाथ वर्पे आणि रावसाहेब बोठे यांनी मुलाखती दिल्या आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’च्या शूटींगमध्ये व्यस्त???

-“राष्ट्रवादीचे गणेश नाईक आपलं सामाज्र वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत आहेत”

-रोहित शर्मा बरोबरच्या वादावर विराट कोहलीचा मोठा खुलासा!

-आता 11 वीच्या पुस्तकात ‘समलैंगिक विवाह आणि लिव्ह इन रिलेशनशीप’चा धडा!

-चाकणकरांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली!