“बाळासाहेब थोरात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत की संगमनेरचे?”

नागपूर |  काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. तर दुसरीकडे पक्षातले नेतेच पक्षनेतृत्वावर शंका उपस्थित करू लागले आहेत काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी बाळासाहेब थोरात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत की संगमनेरचे, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

आशिष देशमुख एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य करत बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

काँग्रेसने जे 5 कार्याध्यक्ष नेमलेत ते देखील फक्त आपल्या मतदारसंघातच फिरत आहेत. काँग्रेसच असा पक्ष आहे जो सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावू शकतो, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून जात आहेत. मात्र शरद पवार साहेबांचं वय त्यांना साथ देत नसताना, तब्येत साथ देत नसताना ज्या ताकदीने आणि हिमतीने महाराष्ट्रभर फिरत आहे आणि राष्ट्रवादीचा विचार घराघरापर्यंत पोहचवत आहेत, असंही देशमुख म्हणाले.

दरम्यान, आशिष देशमुखांच्या टीकेला आता बाळासाहेब थोरात काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-