महाराष्ट्र मुंबई

‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | राज्य सरकारचं कामकाज नागपुरातून चालवावं, यासाठी राज्य सरकारचं मुख्यालय नागपुरात शिफ्ट करावं’अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.

कोरोनामुळे मुंबईतील स्थिती भयावह आहे. मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईतून महाराष्ट्र सरकाराचा कारभार चालवू शकणे कठीण आहे. त्यामुळे सरकारचं कामकाज नागपुरातून सुरु व्हावं. नागपूर सुसज्ज आहे, उपराजधानीचं शहर आहे, असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.

नागपुरात कोरोना रिकव्हरी रेट चांगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राज्य सरकार नागपुरातून चालवण्यासाठी प्रयत्न करावे. मुंबई असुरक्षित झाल्याने शासन नागपुरातून चालवावं, असंही आशिष देशमुख म्हणाले आहेत.

जे सरकार चालवण्यासाठी आवश्यक आहे ते नागपुरात उपलब्ध आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार नागपूरवरुन चालवण्यासाठी प्रयत्न करावे, असं देशमुख म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

-ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ

-सचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार

-अक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का!

-सामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार

-संकटातही बळीराजाची दिलदारी; कोरोना लढ्यासाठी लावला मोठा हातभार