मुंबई | देशाच्या विकासाचं इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील अर्थसंकल्पाने अन्याय केला असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. यावर भाजप नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबईकरांना 24 तास पाणी देऊ अशी “फेंकम फाक” करणाऱ्यांनी 24 तास बार उघडे केले. गेले 3 दिवस मात्र मुंबईकर पाण्यावाचून तडफडत राहिले. भल्यामोठ्या देशाच्या अर्थसंकल्पावर यांनी बोलण्यात काय अर्थ!, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
ऐवढी वर्षे मुबईकरांसोबत अशी “ही बनवाबनवी” सुरु आहे. हे तर ठग्ज आँफ मुंबईकर!, असल्याची घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
दरम्यान, वास्तवाचे भान हरपून युवा, शेतकरी आणि सर्वसामान्यांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमायला लावणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लग्नाचं वय 18 असावं की 21?, आर्चीचं तोंडात बोट घालायला लावणारं उत्तर….!
-कागदोपत्री आकड्यांचा मेळ घालून सादर केलेला अर्थसंकल्प; धीरज देशमुखांची मोदी सरकारवर सडकून टीका
-लोणीकरांचं ते वक्तव्य आक्षेपार्हच… मी त्यांचं समर्थन करणार नाही- चित्रा वाघ
-गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांनी गोंधळलेला अर्थसंकल्प मांडला- जयंत पाटील
-मोदी सरकारच्या बजेटवर रोहित पवारांचं टीकास्त्र; म्हणाले ‘हा तर गंडवागंडवीचा अर्थसंकल्प’!