मुंबई | भाजपला (BJP) राम राम करत राष्ट्रवादीत (NCP) आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे पुन्हा भाजपात जाणार, अशा चर्चा आता राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत.
कारण एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्यात फोनवर देखील चर्चा झाली आहे. त्यामुळे आता वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.
आता या चर्चेवर भाजप आमदार आणि मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी भाष्य केले आहे. खडसे यांच्या प्रवेशाबाबत अमित शहा जो निर्णय घेतील तो भाजपचा निर्णय असेल, असे शेलार म्हणाले.
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत एकीव बातम्या आहेत. गृहमंत्र्यांनी आवश्यता आणि नियोजनानुसार त्यांना वेळ दिली असावी, त्यामुळे आता मी यावर काय भाष्य करणार?, असे शेलार म्हणाले.
दरम्यान या चर्चेवर खुद्द एखनाथ खडसे यांनी उत्तर दिले आहे. मी त्यांच्यासोबत व्यक्तीगत कारणासाठी चर्चा केली आहे. माझी त्यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे खडसे म्हणाले.
मी अमित शहांची भेट घेणार असल्याचे शरद पवारांना सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहे. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीसांना देखील टोला लगावला आहे.
अमित शहांना एकदा भेटलो नाही, मी यापूर्वी देखील त्यांना भेटलो आहे. देवेंद्र फडणवीसांना देखील भेटलो आहे. आणि यापुढेदेखील भेटणार आहे. शहांना भेटू नये असा काही नियम आहे का, असा पलटवार खडसेंनी केला.
तसेच हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून माझे शहा यांच्यासोबत संबंध आहेत, असे स्पष्टीकरण खडसेंनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला हॉलिवूडमधून पाठिंबा; अभिनेत्याने केले ट्वीट
नाना पटोलेंची एकनाथ शिंदेवर मोठी टीका; म्हणाले, सध्याचे नवीन हिंदूहृद्यसम्राट…
“आम्हाला गद्दार म्हणण्यापूर्वी…”; अजित पवरांना शंभुराज देसाईंचा इशारा
अखेर अशोक गहलोत अध्यक्षपदाचे उमेदवार; आता राजस्थानचे मुख्यमंत्री कोण?